शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Shreyas Iyer Photo with Girls: श्रेयस अय्यरच्या हॉटेल रूममध्ये दोन तरूणी? Photo व्हायरल झाला अन् चाहत्यांनी घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 19:28 IST

श्रेयस सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघासोबत आहे

Shreyas Iyer Photo with Girls inside hotel room: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही रोहित शर्माच्या टीम इंडियाने सहज विजय मिळवला. पहिल्या दोन कसोटीत फिरकीला पोषक खेळपट्टी असल्याची टीका झाली. तरीही तिसऱ्या कसोटीत तशीच खेळपट्टी मिळाली. त्यावर ऑस्ट्रेलियाने भारतालाच चारीमुंड्या चीत केले आणि मालिकेत २-१ असे कमबॅक केले. या विजयासोबत ऑस्ट्रेलिया विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला. आता भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चौथी कसोटी जिंकणे आवश्यक आहे. ही कसोटी अहमदाबादमध्ये ९ तारखेपासून सुरू होणार आहे. त्याआधी भारताचा मधल्या फळीतील मुंबईकर (Mumbai) फलंदाज श्रेयस अय्यरच्या रूममधील एका फोटोने फॅन्सना टीका करण्याची संधी दिली. नक्की काय आहे प्रकरण.. जाणून घेऊया.

भारतीय संघाची मधली फळी सध्या रिषभ पंत नसल्याने काहीशी कमकुवत असल्याचे दिसत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा हे तिघे चांगली कामगिरी करत आहेत. पण दुसरा सलामीवीर म्हणून राहुल फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्याशिवाय रिषभ पंत नसल्याने संघात केएस भरतला संधी देण्यात आली आहे. पण त्याचा अनुभव पाहता, संघात आणखी दोन अनुभवी फलंदाज असणे गरजेचे असल्याने, गेल्या दोन सामन्यात श्रेयस अय्यरला संघात संधी देण्यात आली आहे. पण श्रेयसने दुसऱ्या कसोटीत ४ आणि १२ धावा केल्या. तर तिसऱ्या कसोटीत त्याने ० आणि २६ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या खेळाबद्दल त्याच्यावर टीका होत असतानाच, एका फोटोमुळे तो चाहत्यांच्या नजरेत आला आहे.

हा आहे तो फोटो-

श्रेयस अय्यरचा हा फोटो विविध युजर्सनी व्हायरल झाल्यामुळे ट्विट केला आहे. यात, श्रेयस अय्यर दोन तरूणींसोबत मिरर सेल्फीसाठी पोज करताना दिसत आहे. मात्र या फोटोतील बॅकग्राऊंड पाहता, ही हॉटेलची रूम असल्याचे वाटत आहे. त्यामुळे, महिला फॅन्सना थेट खेळाडूंच्या रूममध्ये येण्याची परवानगी मिळते का, असा सवाल अनेकांनी विचारला आहे. काहींनी अय्यरला, महिला फॅन्सकडे लक्ष देण्यापेक्षा खेळावर लक्ष दे, असा सल्ला दिला आहे. तर काही लोकांनी सेल्फी काढणाऱ्या मुलीचीच शाळा घेतली आहे. एखाद्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढताना स्वत:चाच चेहरा झाकणे हा काय प्रकार आहे, असे काही युजर्सने म्हटले आहे.

टॅग्स :India vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाShreyas Iyerश्रेयस अय्यरViral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडियाIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ