आई आहे की वैरीण! आईने चिमुकल्या बाळाला स्कूटीच्या डिक्कीत ठेवलं आणि....सोशल मीडियावर संताप....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:48 IST2026-03-12T14:48:04+5:302026-03-12T14:48:57+5:30

Viral Video : एक महिला तिच्या बाळाला चक्क स्कूटीच्या डिक्कीत ठेवताना दिसत आहे. व्हिडीओ बघून लोकांनी बाळाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्ती करत महिलेच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. 

Shocking! Woman places baby inside scooter box video sparks outrage | आई आहे की वैरीण! आईने चिमुकल्या बाळाला स्कूटीच्या डिक्कीत ठेवलं आणि....सोशल मीडियावर संताप....

आई आहे की वैरीण! आईने चिमुकल्या बाळाला स्कूटीच्या डिक्कीत ठेवलं आणि....सोशल मीडियावर संताप....

Viral Video : आई आपल्या बाळाला तळहाताच्या फोडासारखं जपते, जे सत्य आहे. पण रील्स बनवण्याच्या नादात लोक काय करतील काहीच सांगता येत नाही. याचंच एक धक्कादायक उदाहरण असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  एका धक्कादायक व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. ज्यात एक महिला तिच्या बाळाला चक्क स्कूटीच्या डिक्कीत ठेवताना दिसत आहे. व्हिडीओ बघून लोकांनी बाळाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत महिलेच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. 

स्कूटी किंवा कोणत्याही गाडीची डिक्की ही हेल्मेट किंवा छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी असते. पण या महिलेने चक्क आपलं छोटसं बाळ डिक्कीत ठेवलं आणि गाडी चालवत बाहेर पडली. व्हिडिओच्या सुरूवातीलाच आपण बघू शकता की, एक महिला घराबाहेर बाळाला घेऊन उभी आहे. समोरच एक स्कूटी उभी आहे. ती स्कूटीची डिक्की उघडते आणि बाळाला हळूच त्यात ठेवले. नंतर डिक्की बंद करते. इतकंच नाही तर ही महिला गाडी सुरू करून पुढे जाते. व्हिडिओतून कळून येतं की, स्कूटी मध्य प्रदेशची पासिंग आहे. नंबर प्लेटवर एमपी असं दिसून येत आहे.


लोकांनी व्यक्त केली चिंता

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच व्हायरल झालाय. लोकांनी यावर कमेंट्स करत महिलेला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. तसेच चिंता व्यक्त करत म्हणाले की, अशाप्रकारचं कृत्य हे बाळासाठी घातक ठरू शकतं. एक यूजरने लिहिलं की, "कसे कसे लोक पालक बनतात". तर दुसऱ्याने लिहिलं की, "आशा आहे की, ही केवळ एक स्क्रिप्ट आहे". काही लोकांनी कमेंट्स केल्या की, महिलेने लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी हा व्हिडीओ बनवला असेल, खूप संतापजनक प्रकार आहे. 

Web Title : माँ ने बच्चे को स्कूटी की डिक्की में रखा, ऑनलाइन आक्रोश।

Web Summary : एक वायरल वीडियो में एक महिला अपने बच्चे को स्कूटी की डिक्की में रखती हुई दिखाई दे रही है, जिससे आक्रोश फैल गया। बच्चे की सुरक्षा को लेकर चिंता जताई जा रही है, दर्शकों ने इस कृत्य को खतरनाक और गैर जिम्मेदाराना बताया। स्कूटी का रजिस्ट्रेशन मध्य प्रदेश का है।

Web Title : Mother puts baby in scooter trunk, sparks outrage online.

Web Summary : A viral video shows a woman placing her baby in a scooter's trunk, causing outrage. Concerns are raised about the child's safety, with viewers condemning the act as dangerous and irresponsible. The scooter has Madhya Pradesh registration.