SHOCKING: प्रेमाच्या 'खात्री'साठी जीवघेणी परीक्षा; गर्लफ्रेंडला टपावर बांधलं अन् रस्त्यावर पळवली कार, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 23:36 IST2021-08-04T23:35:35+5:302021-08-04T23:36:17+5:30

सोशल मीडियाचा कोण कसा वापर करेल याचा नेम नाही, या सोशल मीडियाचे काही प्लस पॉईंट्स आहेत, तर काही मायनस...

SHOCKING: In 'trust test' stunt, influencer drives car with girlfriend tied to roof; draws flak, Video | SHOCKING: प्रेमाच्या 'खात्री'साठी जीवघेणी परीक्षा; गर्लफ्रेंडला टपावर बांधलं अन् रस्त्यावर पळवली कार, Video

SHOCKING: प्रेमाच्या 'खात्री'साठी जीवघेणी परीक्षा; गर्लफ्रेंडला टपावर बांधलं अन् रस्त्यावर पळवली कार, Video

सोशल मीडियाचा कोण कसा वापर करेल याचा नेम नाही, या सोशल मीडियाचे काही प्लस पॉईंट्स आहेत, तर काही मायनस... सोशल मीडियावर दोन दिवसांपासून एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात एका तरुणीला कारच्या टपावर रस्सीने बांधले असून तिच्या तोंडावर टेप लावण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर कारमध्ये बसलेली व्यक्ती त्या तरुणीचा एक हात पकडून कार रस्त्यावर पळवताना दिसत आहे. मागच्या सीटवर एक व्यक्ती बसून कार बाहेरील लोकांच्या रिअॅक्शन टिपताना दिसत आहे. त्यामुळे हे नक्की काय चाललंय, याबाबतची उत्सुकताही अधिक वाढत चाललेली दिसत आहे. 

रशियन सेर्गे कोसेन्को नावाची सोशल मीडिया सेलेब्रिटीनं त्याच्या इंस्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  बेनल्टी कारवर प्रेयसीला रस्सीने बांधून कोसेन्को मॉक्सोच्या रस्त्यांवर पळवत आहे. त्याची ही कृती रस्त्यावरील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कोसेन्कोच्या म्हणण्यानुसार तो व त्याची प्रेयसी एकमेकांवरील प्रेमाच्या खात्रीची परीक्षा देत आहे आणि त्यापैकी ही एक परीक्षा आहे. पण, त्याचा हा स्टंट त्याला महागात पडला असून त्याला 750 rublesचा दंड भरावा लागला आहे. 

मॉस्कोतील ट्राफिक अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहे. या व्हिडीओमागील फॅक्ट्सचा तपास त्यांच्याकडून सुरू करण्यात आला आहे.  

Web Title: SHOCKING: In 'trust test' stunt, influencer drives car with girlfriend tied to roof; draws flak, Video