Shocking News: जोडप्याने फक्त एका मिनिटासाठी विजेचा वापर केला, कंपनीने पाठवले 19 हजार कोटींचे बिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 16:03 IST2022-03-24T16:03:10+5:302022-03-24T16:03:31+5:30
Shocking News: तुम्ही अनेकदा जास्त बिल मिळाल्याच्या बातम्या वाचल्या असतील, पण एका जोडप्याला एक-दोन नव्हे, तर चक्क 19 हजार कोटी रुपयांचे बिल आले.

Shocking News: जोडप्याने फक्त एका मिनिटासाठी विजेचा वापर केला, कंपनीने पाठवले 19 हजार कोटींचे बिल
Viral News: तुम्ही अनेकदा जास्त लाईट बिल आल्याच्या बातम्या वाचल्या असतील. अनेकदा गरीब कुटुंबातील व्यक्तीला हजारो रुपयांचे बिल मिळाल्याचे वृत्त समोर येत असते. पण, तुम्ही कधीच एखाद्या कुटुंबाला कोट्यवधी रुपयांचे बिल मिळाल्याची बातमी ऐकली नसेल. असाच एक प्रकार इंग्लंडमध्ये राहणाऱ्या जोडप्यासोबत घडला आहे. या दाम्पत्याला एक-दो नव्हे तर तब्बल 19 हजार कोटी रुपयांचे बिल आले.
19 हजार कोटींचे बिल
सामान्य कुटुंबातील या जोडप्याला चक्क 19 हजार कोटींचे बिल पाहून जोरदार धक्काच बसला. त्या दाम्पत्याने सकाळी फक्त एक मिनिटासठी विजेचा वापर केला होता. यानंतर त्यांना 1.9 बिलीयन पौंड (19,146 कोटी रुपये) बिल आले. सॅम मोट्राम आणि मॅडी रॉबर्टसन या जोडप्याला त्यांच्या शेल एनर्जीच्या अॅपवर बिलाचा मेसेज आला.
नेमका काय प्रकार आहे?
इंग्लंडमधील हार्पेंडेन येथे राहणारे जोडपे त्यांच्या गॅस आणि विजेवर दरवर्षी सुमारे £1300 (1 लाख तीस हजारांहून अधिक) खर्च करतात. 'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सॅम म्हणाला, 'सुरुवातीला बिल पाहून आम्हाला विश्वास बसला नाही. मॅडीला वाटले की, मी तिची मस्करी करत आहे. पण, अॅपवर बिल पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. मला माहित होते की, बिल वाढणार आहे, पण इतके वाढले, याचा कधीच विचार केला नव्हता.'
तक्रार केल्यानंतर प्रकार उघडकीस आला
सुदैवाने, त्या जोडप्याच्या खात्यात एवढी रक्कम नव्हती, नाहीतर ती पूर्ण रक्कम ऑटो डेबिटद्वारे कापली गेली असती. दाम्पत्याने या बिलाचा फोटो शेल एनर्जीसोबत शेअर केला, त्यानंतर कंपनीने याला तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले. चुकीने बिल आल्याचे समजल्यावर जोडप्याने सुटकेचा निश्वाःस सोडला.