या 'सतरंगी चहा'ला सोशल मीडियाची पसंती, कसा करतात हा चहा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 16:55 IST2019-01-14T16:53:08+5:302019-01-14T16:55:05+5:30
आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चहा प्यायले असालच. पण कधी सतरंगी चहा प्यायलात का? होय! सतरंगी चहा. म्हणजे सात रंग असलेला चहा.

या 'सतरंगी चहा'ला सोशल मीडियाची पसंती, कसा करतात हा चहा?
आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चहा प्यायले असालच. पण कधी सतरंगी चहा प्यायलात का? होय! सतरंगी चहा. म्हणजे सात रंग असलेला चहा. गेल्या काही दिवसांपासून हा सतरंगी चहा सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. असं काय वेगळेपण आहे या चहाचं? चला जाणून घेऊ....
मीडिया रिपोर्टनुसार, या सतरंगी चहामुळे पर्यटक ढाकाकडे आकर्षित होत आहेत. ज्या दुकानावर हा चहा मिळतो त्या दुकानाचं नाव Rangdhonu(इंद्रधनुष) असं आहे. हे दुकान Saiful Islam हा चालवतो. SaiFul ने हा चहा मौलवी बाजारातील एका चहावाल्याकडून शिकला होता.
किती रुपयांना मिळतो हा चहा
सामान्यपणे चहाची किंमत ८ ते १० रुपये असते. पण या सतरंगी चहाची किंमत ७० रुपये आहे. हा चहा करण्याचा एक खास फॉर्म्यूला केवळ Siful याला माहीत आहे. पण तरिही हा चहा तयार करण्यासाठी तो कशाचा वापर करतो हे त्यांने सांगितले.
हा सतरंगी चहा तयार करण्यासाठी वेगवेगळे मिश्रण आणि चीनच्या वेगळ्या चहाचा वापर केला जातो. हा चहा तयार करण्यासाठी तीन ब्लॅक टी, एक ग्रीन टी आमि दुधासोबतच अनेक मसाले वापरले जातात. त्यामुळे या चहाच्या प्रत्येक मिश्रणाची वेगळी टेस्ट लागते. ज्यात तुम्हाला संत्री, काळा, पांढरा, स्ट्रॉबेरी, दूध आणि हिरव्या रंगात चहा मिळतो.
हा चहा पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. कारण हा तयार करण्यासाठी कोणत्याही रसायनाचा वापर केला जात नाही. रिपोर्ट्सनुसार, या चहातील पांढरा भाग हा आल्यापासून तयार केलेला असतो. ग्लासमध्ये हा चहा दिसतोही इतका आकर्षक की, एखादं मिक्स ज्यूस वाटतं.