सचिनच्या बहिणीसोबत सीमा हैदरचा जबरदस्त डान्स, 1 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 15:08 IST2023-09-07T15:01:13+5:302023-09-07T15:08:36+5:30
Seema Haider Dance Video : सध्या सीमा हैदरचा तिच्या नणंदेसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोघीही डान्स करताना दिसत आहे.

सचिनच्या बहिणीसोबत सीमा हैदरचा जबरदस्त डान्स, 1 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ
सीमा हैदर आणि सचिन मीणा यांची लव्हस्टोरी आता सगळ्यांनाच माहीत झाली आहे. पाकिस्तानातील सीमा हैदरला यूपीच्या ग्रेटर नोएडामधील सचिनसोबत पब्जी गेमच्या माध्यमातून प्रेम झालं होतं. दोघे इतके प्रेमात पडले की, सीमा आपल्या चार मुलांना घेऊन बेकायदेशीरपणे भारतात आली. त्यानंतर सगळ्यांनाच त्यांची लव्हस्टोरी समजली. सोशल मीडियावर त्यांची रोज चर्चा होते. सध्या सीमा हैदरचा तिच्या नणंदेसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोघीही डान्स करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ सचिनची बहीण पिंकी मीणाच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 16.9 मिलियन म्हणजे 1 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 3 लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. शेकडो यूजर यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
हे पहिल्यांदाच आहे की, पिंकीने तिच्या वहिनीसोबत रिल बनवली आहे. याआधी तिने सीमा आणि सचिनचे व्हिडीओ तिच्या अकाउंटवर पोस्ट केले होते. ज्यांना कोट्यावधी व्हयूज मिळाले आहेत. पिंकीच्या इन्स्टाला 75 हजारांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
व्हिडिओत सीमा लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. तर पिंकीने सूट घातला आहे. दोघीही घराच्या छतावर 'बेईमान पिया रे बड़ा जुल्म किया...' गाण्यावर डान्स करत आहेत.