ATM मशीनजवळ जमिनीवर बसून सिक्युरिटी गार्ड अभ्यास करत होता; IAS अधिकाऱ्याने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 11:21 AM2021-04-10T11:21:04+5:302021-04-10T11:22:32+5:30

हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Security guards studying were sitting on the ground near the ATM machine Photo shared by IAS officer | ATM मशीनजवळ जमिनीवर बसून सिक्युरिटी गार्ड अभ्यास करत होता; IAS अधिकाऱ्याने शेअर केला फोटो

ATM मशीनजवळ जमिनीवर बसून सिक्युरिटी गार्ड अभ्यास करत होता; IAS अधिकाऱ्याने शेअर केला फोटो

googlenewsNext

सोशल मीडियावर अनेकदा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही फोटो पाहून मनाला खूप वेदना होतात. तशाच पद्धतीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो फोटो पाहून तुम्हीही भावूक व्हाल. इंटरनेटवर व्हायरल होणारा हा फोटो एका सिक्युरिटी गार्डचा आहे. जो ATM मशीनच्या शेजारी जमिनीवर बसला आहे. जो ड्युटी सांभाळून स्वत:चा अभ्यासही करत आहे.

हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए” या फोटोत आपण पाहू शकता की, कशाप्रकारे एक सिक्युरिटी गार्ड ATM मशीनजवळ जमिनीवर बसला आहे. हा फोटो पाहून या सिक्युरिटी गार्डला आयुष्यात काहीतरी करण्याची आणि बनण्याची किती जिद्द आहे ते दिसून येते.

या फोटोला आतापर्यंत ८ हजारापेक्षा अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. सिक्युरिटी गार्डचं कौतुक होत असून त्याच्या जिद्दीला युजर्स सलाम करत आहेत. हा फोटो पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल.

Read in English

Web Title: Security guards studying were sitting on the ground near the ATM machine Photo shared by IAS officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.