सलमानने खरेदी केलं जगातलं सर्वात महाग घर, बघा आलिशान घराचे फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 18:01 IST2018-08-20T17:30:05+5:302018-08-20T18:01:28+5:30
सौदी अरबचा राजकुमार मोहम्मद बिन सलमानने जगातलं सर्वात महागडं घर खरेदी केलं आहे. हे घर त्याने २०१७ मध्ये खरेदी केलं होतं.

सलमानने खरेदी केलं जगातलं सर्वात महाग घर, बघा आलिशान घराचे फोटो!
सौदी अरबचा राजकुमार मोहम्मद बिन सलमानने जगातलं सर्वात महागडं घर खरेदी केलं आहे. हे घर त्याने २०१७ मध्ये खरेदी केलं होतं. या फ्रेंच महलाची खरेदी ३९.२ कोटी डॉलरला झाली. चला बघुया जगातल्या सर्वात महाग घराचे काही खास फोटो....
फ्रान्सच्या वर्सेलीजजवळ हा आलिशान महल आहे. या महलाबाबत अमेरिकन मॉडल किम कर्दाशिया एकदा म्हणाली होती की, हा महल परफेक्ट वेडिंग लोकेशन आहे. २०१५ मध्ये जेव्हा हा महल विकला गेला होता तेव्हा हा कुणी खरेदी केला हे कुणालाच माहीत नव्हते. फोर्ब्सच्या यादीत या महलाला जगातलं सर्वात महागडं घर म्हणून सांगण्यात आलंय.
एमाद खाशोगी या महलाचे डेव्हलपर आहेत. महलाच्या आतील भाग पांरपारिक शिल्पकारीने सजावला गेला आहे. यामुळे या महालाला आलिशान लूक मिळतो.
(Photo: Cogemad)
या महालाची बाग फारच आकर्षक तयार करण्यात आली आहे. तसेच या बागेत पाण्याचे कारंजेही तितकेच सुंदर आहेत. सगळ्या सोयी-सुविधा या महालात आहेत. इतकेच नाही तर माहालातून समुद्रातील रंगीबेरंगी मासेही बघता येतात.