संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:37 IST2025-08-02T16:35:05+5:302025-08-02T16:37:14+5:30

Transgender Anaya Bangar Batting: मुलगा ते मुलगी प्रवास केल्यावरही अनायाचे क्रिकेटवरील प्रेम कायम

sanjay banger transgender daughter anaya bangar shows batting skills video viral on social media | संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO

संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO

Transgender Anaya Bangar Batting: अनया बांगर हे नाव गेल्या सहा-आठ महिन्यांत खूप चर्चेत आलं. या नावामागचे कारण म्हणजे, भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर हा लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलगी झाली. तिने अनया बांगर अशी नवी ओळख घेतली. आर्यन असताना ती लहानपणापासून क्रिकेट खेळायची. तिला हा खेळ तिचे वडील संजय बांगर यांच्याकडून शिकायला मिळाला. त्यामुळे मुलगा ते मुलगी हा प्रवास केल्यानंतर तिचे क्रिकेटवरील प्रेम कमी झालेले नाही. आजही ती जेव्हा बॅट हातात घेते, तेव्हा ती धुवाँधार फलंदाजी करताना दिसते.

अनन्या बांगरची स्फोटक फलंदाजी

डावखुरी फलंदाज अनाया बांगर हिने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिचा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अनाया बांगर यात अतिशय स्फोटक फलंदाजी करताना दिसते. ती आपल्या फलंदाजीचा सराव करतानाही दमदार फलंदाजी करताना दिसते. तिने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, अनाया एकूण ७ चेंडूंचा सामना करते. त्यापैकी ६ चेंडूंवर दमदार शॉट्स मारण्यात ती यशस्वी होते. अनाया बांगरच्या फलंदाजीत कव्हर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह आणि पुल शॉट अशी एकाहून एक अप्रतिम फटकेबाजी दिसून येते. पाहा व्हिडीओ-


दरम्यान, अनाया बांगरने BCCI आणि ICC कडे एक विशेष मागणी केली आहे. ही मागणी ट्रान्सजेंडर महिलांबद्दल आहे. उघडपणे आपली ओळख सांगणाऱ्या ट्रान्सजेंडर खेळाडू अनायाने क्रिकेटमधील समावेश आणि निष्पक्षतेबाबत मागणी केली आहे. तिने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ट्रान्सजेंडर महिलांसाठी धोरणे तयार करण्याचे आवाहन केले आहे. हे धोरण विज्ञान आणि डेटा यावर आधारित असावे असेही तिने म्हटले आहे.

Web Title: sanjay banger transgender daughter anaya bangar shows batting skills video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.