Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:55 IST2025-08-07T15:54:48+5:302025-08-07T15:55:18+5:30
Saiyaara Song Corporate Version: अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या सैयारा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कोणाला आवडला, कोणाला नाही, लोकांनी ३५-४० शी चे लोक सिनेमापाहताना रडरड रडत असल्याची चर्चा झाली म्हणून देखील कुतूहलतेने हा सिनेमा जाऊन पाहिला आहे.

Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
सैयारा सिनेमाने ५०० कोटींचा गल्ला जमविला आहे. अजून या सिनेमाची कमाई सुरुच आहे. अशातच सैयारा सिनेमाच्या एका गाण्यावरून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने नोकरदारांच्या पगार, ईएमआय आदी खर्चाच्या व्यथा सांगणारे गाणे तयार केले आहे. हे गाणे ऐकून सैयाराच्या प्रेक्षकांप्रमाणे नोकरदारांनाही रडू कोसळणार आहे.
अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या सैयारा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कोणाला आवडला, कोणाला नाही, लोकांनी ३५-४० शी चे लोक सिनेमापाहताना रडरड रडत असल्याची चर्चा झाली म्हणून देखील कुतूहलतेने हा सिनेमा जाऊन पाहिला आहे. अर्थात त्यांचे पैसे वाया गेले पण सैयाराच्या ५०० कोटी होण्यासाठी कामाला आले. अशातच सैयाराच्या गाण्यावर निश्चय वर्मा या इन्फ्लुएन्सरने कार्पोरेट स्लेव साँग नावाने एक व्हिडीओ बनविला आहे.
या व्हिडिओमध्ये त्याने स्वत:ला दमलेला, निराश असलेला कार्पोरेट कर्मचारी दाखविले आहे. यात तो २५ हजार पगार, त्यातले १० हजार रुपये घरभाडे देण्यासाठी जात असल्याचे म्हटले आहे. फोनचा ईएमआय, उरलेले जेवणासाठी जातात. मग महिना कसा काढू असा सवाल विचारला आहे. एवढेच नाही तर ९-५ कामात अडकलो, खासगी आयुष्यच राहिले नाही. काही उरतच नाही, त्याच पिणे, फुकण्याचे खर्च वेगळेच, असे त्याने म्हटले आहे.
या व्हिडीओतून त्याने कार्पोरेट कर्मचाऱ्यांचे आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात सगळेच काही १० हजार भाडे देत नाहीत. तर सगळ्यांनाच काही २५ हजार पगार नाही, तसेच सगळेच काही पित, फुकत नाहीत, परंतू त्याने जोडलेले शब्द नोकरदारांना भावलेले त्याच्या एकंदरीत व्यूव्ज आणि लाईकवरून दिसत आहेत.