प्रवचन देता देता संतांना हृदयविकाराचा झटका; कार्यक्रमात जीव सोडला; घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 17:06 IST2021-11-16T17:06:13+5:302021-11-16T17:06:40+5:30
अनुयायांना संबोधित करताना संतांना हृदयविकाराचा झटका; घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

प्रवचन देता देता संतांना हृदयविकाराचा झटका; कार्यक्रमात जीव सोडला; घटना कॅमेऱ्यात कैद
बंगळुरू: कर्नाटकच्या बेळगावीमध्ये एका कार्यक्रमात प्रवचनादरम्यान संतांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांनी मंचावरच प्राण सोडला. ही घटना ६ नोव्हेंबरला घडली. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
संत संगना बसवा स्वामी कर्नाटकच्या बेळगावीमध्ये अनुयायांना संबोधित करत असताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. प्रवचन देत असताना अचानक बसवा स्वामी बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
प्रवचन देता देता संतांना हृदयविकाराचा झटका; घटना कॅमेऱ्यात कैद https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/gwR7fSxtrv
— Lokmat (@lokmat) November 16, 2021
संगना बसवा स्वामी बलोबला मठाचे प्रमुख संत होते. बसवयोगा मंडप ट्रस्टचे प्रमुख म्हणून ते काम पाहायचे. ६ नोव्हेंबरला त्यांचा ५३ वा वाढदिवस होता. त्या दिवशी ते आपल्या अनुयायांना संबोधित करत होते. अनुयायांना संबोधित करत असताना ते अचानक बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या महिन्यात राजस्थानात अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी पोटनिवडणूक प्रचारादरम्यान एका नेत्याचा भाषणादरम्यान मृत्यू झाला होता. त्यावेळी मंचावर मुख्यमंत्री अशोक गेहलोतदेखील उपस्थित होते. भाषण देत असताना काँग्रेस नेत्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.