शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

१० किंवा त्यापेक्षा जास्त मुले असलेल्या महिलांना मिळणार अवॉर्ड, सरकारचा अजब फतवा!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 12:54 IST

मागील मोठ्या कालावधीपासून युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे.

नवी दिल्ली : मागील मोठ्या कालावधीपासून युक्रेन आणि रशिया (Ukrain And Russia War) यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगभरातील अनेक देशांना महागाईचा फटका बसत आहे. युद्धामुळे रशियातील लोकसंख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे, यावर उपाय म्हणून राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. म्हणजेच १० किंवा त्याहून अधिक मुलांना जन्म देणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. या महिलांना  Mother Heroin हा अवॉर्ड देऊन गौरविण्यात येईल. याशिवाय अशा महिलांना १६,१३८ डॉलर म्हणजेच जवळपास १० लाख रूपये एवढी रक्कम दिली जाणार आहे.

हा सन्मान आणि पुरस्कार मिळवण्यासाठी संबंधित स्त्री रशियन फेडरेशनची नागरिक असणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे दहावे मूल एक वर्षाचे झाले आहे त्यांनाही हा सन्मान देण्यात येणार आहे. तसेच एखाद्या आईने युद्ध, दहशतवादी हल्ला किंवा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत आपले मूल गमावल्यास ती देखील या पुरस्काराची पात्र असल्याचे सांगितले जात आहे. 

'मदर हिरोईन' अवॉर्डचा इतिहास 'मदर हिरोईन' या अवॉर्डची सुरूवात १९४४ मध्ये झाली होती. माजी सोव्हिएत नेते जोसेफ स्टॅलिन यांनी हा सन्मान देण्यास सुरूवात केली होती. दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या मृत्यूमुळे याची घोषणा करण्यात आली होती, परंतु १९९१ मध्ये हा पुरस्कार बंद करण्यात आला होता. 

विशेष म्हणजे रशियाच्या लोकसंख्येत घट झाली असून सध्या हा आकडा जवळपास १४ कोटींच्या घरात आहे. लोकसंख्या वाढवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकार आता लोकांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. या फतव्यामागील हेतू जरी वेगळा असला तरी याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनGovernmentसरकारWomenमहिला