शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

"रोहित शेट्टीजी तुम्हाला आता अणुबॉम्बची गरज भासेल...", आनंद महिंद्रा यांचं 'ते' ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 8:31 PM

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेले प्रेरणादायी व्हिडिओ (Inspiring Video) ट्विटरवर खूप ट्रेंड करत असतात. 

मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. आनंद महिंद्रा यांच्या व्यावसायिक कौशल्याव्यतिरिक्त लोक त्यांच्या सेंस ऑफ ह्यूमरचे सुद्धा चाहते  (Fan)आहेत. अशातच आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेले प्रेरणादायी व्हिडिओ (Inspiring Video) ट्विटरवर खूप ट्रेंड करत असतात. 

महिंद्राच्या नव्या एसयूव्हीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता कंपनीने एसयूव्हीचे नाव आणि फर्स्ट लुक रिलीज केला आहे. महिंद्राची एसयूव्ही महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio N) या नावाने बाजारात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना अनुसरून एक ट्विट केले आहे. "रोहित शेट्टीजी, गाडी उडवण्यासाठी तुम्हाला आता एका अणुबॉम्बची आवश्यकता भासेल....", असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

दरम्यान, रोहित शेट्टी हे बॉलिवूडमधील अॅक्शन दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारे स्टंट आणि धमाकेदार अॅक्शन सीन्स पाहायला मिळतात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात प्रेक्षकांना गाड्यांवरील स्टंट पाहायला मिळतात. या अनोख्या शैलीतून त्याने बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळेच स्थान प्रस्थापित केले आहे.  'जमीन', 'गोलमाल', 'संडे', 'गोलमाल रिटर्न्स', 'ऑल द बेस्टः फन बिगिन्स', 'गोलमाल 3', 'सिंघम', 'बोल बच्चन', 'चेन्नई एक्सप्रेस', 'सिंघम रिटर्न्स' यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. 

महिंद्रा स्कॉर्पिओ एन लवकरच येणार बाजारातमहिंद्राची एसयूव्ही महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio N) या नावाने बाजारात येणार आहे. नवीन टीझर व्हिडिओमध्ये कंपनीने पहिल्यांदाच कारची संपूर्ण झलक दाखवली आहे. या महिंद्रा कारच्या जाहिरात बॉलीवूडचे बिगबी अमिताभ बच्चन (BigB Amitabh Bachchan) यांचा आवाज आहे. नवीन टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांना 'मुबारक हो, बाप हुआ है!' म्हणताना ऐकू शकता. नवीन  Mahindra Scorpio N चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये (Mahindra Research Valley) तयार करण्यात आली आहे. तसेच, हे डिझाइन मुंबईतील महिंद्रा इंडिया डिझाइन स्टुडिओमध्ये ( Mahindra India Design Studio) करण्यात आले आहे. कंपनी 27 जून रोजी Mahindra Scorpio N लाँच करणार आहे. त्याच दिवशी कारची किंमत जाहीर होणार असल्याचे समजते.

अनेक फीचर्स पाहायला मिळतीलनवीन Mahindra Scorpio N चे इंजिन आणि फीचर्सची माहिती अजून समोर आलेली नाही, पण नवीन व्हिडिओ सोबत कारचा लूक समोर आला आहे. यात नवीन एलईडी हेडलॅम्प, सी-आकाराचे एलईडी डीआरएल आणि एलईडी फॉग लॅम्प असतील. कारचा लूक अतिशय स्पोर्टी आहे, तर समोरच्या ग्रिलमुळे ते खूप बोल्ड आहे. Mahindra Scorpio N बाबत आणखी काही संकेत देखील समोर आले आहेत. जसे की कारची बॉडी लाइन कर्व्ही आहे. यात स्पोर्टी अलॉय व्हील्स आहेत, जे काहीसे XUV700 सारखे दिसतात. ही डी-सेगमेंटची कार आहे. त्यामुळे यामध्ये पॉवरफुल डिझेल इंजिन मिळू शकते. याचबरोबर, कारचा इनर स्पेस देखील वाढविण्यात आला आहे. यासोबतच अनेक फ्युचरिस्टिक फीचर्सही यात पाहायला मिळतील. याशिवाय, नवीन Mahindra Scorpio N मध्ये तुम्हाला सनरूफ, ऑटोमॅटिक ORVM, छतावरील साइड रेल्स आणि शार्क अँटेना यांसारखे फीचर्स पाहायला मिळतील. तसे, कारच्या मागील बाजूस ब्रेक लाईट दरवाजाच्या वर देण्यात आला आहे. तर टेल लाइट देखील सी-आकारात असतील.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राRohit Shettyरोहित शेट्टीMahindraमहिंद्राAutomobileवाहन