कमाल मोमेंट! कपल करत होतं वेडिंग शूट, रोहित शर्मानं डान्स करून दिलं त्यांना खास सरप्राइज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:02 IST2025-11-11T16:01:32+5:302025-11-11T16:02:20+5:30
Rohit Sharma Viral Video With Couple : वेडिंग फोटोशूट करणाऱ्या जोडप्याकडे रोहित शर्माची नजर गेली आणि त्यांच्या मनात लगेच एक मजेशीर कल्पना आली. हा सुंदर क्षण आणखी खास कसा बनवता येईल? असा विचार त्यांच्या मनात आला.

कमाल मोमेंट! कपल करत होतं वेडिंग शूट, रोहित शर्मानं डान्स करून दिलं त्यांना खास सरप्राइज
Rohit Sharma Viral Video With Couple : एक नवविवाहित जोडपं आपल्या प्री-वेडिंग शूटमध्ये व्यस्त होतं. सगळं छानपणे, परफेक्ट फ्रेममध्ये कॅमेरात कैद करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असताना, अचानक अशी घटना घडली की, हा क्षण त्यांच्या आयुष्यातला सर्वात खास आठवणींपैकी एक बनला. कारण काय तर... त्या ठिकाणी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा वर्कआउट करत होता. वेडिंग शूट करणाऱ्या जोडप्याकडे त्यांची नजर गेली आणि त्यांच्या मनात लगेच एक मजेशीर कल्पना आली. हा सुंदर क्षण आणखी खास कसा बनवता येईल? असा विचार त्यांच्या मनात आला.
जराही वेळ न घालवता रोहितने आपल्या स्पीकरवर प्रसिद्ध गाणं 'आज मेरे यार की शादी है' लावलं. इतकंच नाहीतर त्याने डान्स सुद्धा केला. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह, आनंद आणि मस्ती पाहण्यासारखी होती. तो जणू त्या जोडप्याचा जवळचा मित्र असल्यासारखा मोठ्या आनंदात नाचत होता.
हे पाहून नवविवाहित जोडपंही आश्चर्यचकित झालं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. हा अचानक घडलेला क्षण कॅमेरात अडकला आणि त्यांचा वेडिंग शूटला एक मजेदार, अविस्मरणीय अध्याय मिळाला.
A newly engaged couple was doing their wedding shoot, and when Rohit saw them while working out, he played the song "Aaj Mere Yaar Ki Shaadi Hai" on his speaker and started dancing.😃🫡
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) November 10, 2025
The way Couple said "ye to moment ho Gaya" 🥹
bRO made their wedding more special❤️ pic.twitter.com/E8TefTYAv9
नवविवाहित जोडप्याची प्रतिक्रिया काय होती?
रोहितचा हा गोड हावभाव पाहून जोडपं सुद्धा आनंदात नाचू लागलं. नवरीने तर तेव्हा गुजरातीमध्ये उत्साहाने म्हटलं, “हे तर मोमेंट हो गयो!”
यातून हे दिसून येतं की, रोहितने त्यांच्या खास दिवशी एक असं सुंदर आणि आठवणीत राहील असा क्षण तयार करून दिला होता. त्यांनी कधी कल्पनाही केली नसती की त्यांच्या शूटदरम्यान असा एखादा अज्ञात व्यक्ती अचानक आनंदाचा वर्षाव करेल.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रोहित शर्माच्या या दिलखुलास डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक रोहितच्या या स्वभावाचं कौतुक करत आहेत.