ऋषी सुनक यांचा बायोपिक, नेटकऱ्यांनीच केली कास्टिंग; अक्षय कुमारसह या अभिनेत्यांचे नाव आघाडीवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 16:25 IST2022-10-27T16:24:20+5:302022-10-27T16:25:02+5:30

ऋषी सुनक युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा चेहरा अनेकांशी जुळवून मजेशीर मीम्स बनवले जात आहेत.

Rishi Sunak's biopic, cast by netizens; The name of these actors along with Akshay Kumar in the lead... | ऋषी सुनक यांचा बायोपिक, नेटकऱ्यांनीच केली कास्टिंग; अक्षय कुमारसह या अभिनेत्यांचे नाव आघाडीवर...

ऋषी सुनक यांचा बायोपिक, नेटकऱ्यांनीच केली कास्टिंग; अक्षय कुमारसह या अभिनेत्यांचे नाव आघाडीवर...


ऋषी सुनक युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा चेहरा अनेकांशी जुळवून मजेशीर मीम्स बनवले जात आहेत. सोशल मीडिया युजर्स आशिष नेहरापासून अक्षय कुमारपर्यंत, अनेकांशी ऋषी सुनक यांची तुलना करत आहेत. यातच आता सुनक यांच्या बायोपिकची चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली असून, नेटकऱ्यांनी यासाठी स्टार्सचीही निवड केली आहे. या लिस्टमध्ये अभिनेता अक्षय कुमारचे नाव आघाडीवर आहे.


अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्यामुळे, अनेकदा तो ट्रोल होतो. याशिवाय, एखाद्या भारतीय व्यक्तीने मोठे यश मिळवल्यावरही अक्षय कुमार, त्याचा बायोपिक करणार, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू होतात. अशाच चर्चा आता ऋषी सुनक यांच्याबद्दल सुरू झाल्या आहेत. सुनक यांचा बायोपिक आल्यास, अक्षय कुमार त्यांची भूमिका साकारणार, असे मीम्स सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

सोशल मीडियावर अक्षय कुमारचा फोटो ऋषी सुनक यांच्या चेहऱ्याची मिळवून पाहिला जात आहे. याशिवाय, त्याच्या नमस्ते लंडन चित्रपटातील एक मोनोलॉगही(ज्यात तो इंग्लिश लोकांसमोर भारताचे कौतुक करतो) व्हायरल केला जात आहेत. 'द क्राउन' नावाची मालिका राणी एलिझाबेथ II वर आधारित आहे. आता लोक या मालिकेच्या दुसऱ्या सीजनमध्ये अक्षय सुनक यांची भूमिका साकारणार, असे म्हटले जात आहे.


या दोन अभिनेत्यांचीही नावं आली

अक्षय कुमारसोबतच इतर दोन अभिनेत्यांच्या नावाचीही चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या दोन अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि जिम सार्भचा समावेश आहे. यांचे फोटोही ऋषी सुनक यांच्या चेहऱ्याची मिळवून पाहिले जात आहेत. विशेष म्हणजे, सुनक पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात आधी क्रिकेटर आशिष नेहराचा चेहरा मिळवून पाहिला गेला आहे. नेहराचा चेहरा सुनक यांच्याशी मिळता-जुळता आहे. दरम्यान, सुनक यांच्या आयुष्यावर बायोपिक बनले की नाही, हे येणाऱ्या काळात कळेल. पण, तोपर्यंत तुम्ही सगळे मीम्सचा आनंद घ्या...

 

Web Title: Rishi Sunak's biopic, cast by netizens; The name of these actors along with Akshay Kumar in the lead...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.