VIDEO: आता भोगा! कुत्र्याला लाथ मारायचा प्रयत्न केला अन् 'कर्मा'नं गेला; रिक्षाचा अपघात कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 13:50 IST2021-05-17T13:46:40+5:302021-05-17T13:50:01+5:30
संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद; अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO: आता भोगा! कुत्र्याला लाथ मारायचा प्रयत्न केला अन् 'कर्मा'नं गेला; रिक्षाचा अपघात कॅमेऱ्यात कैद
पिंपरी चिंचवड : रस्त्यावर शांतपणे उभ्या असलेल्या कुत्र्याला चालत्या रिक्षातून लाथ मारणं एका रिक्षा चालकाला महागात पडलं आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या प्रयत्नात रिक्षाला अपघात झाला आणि चालकच रिक्षाबाहेर फेकला गेला. यानंतर नियंत्रणाबाहेर गेलेल्या रिक्षानं दुभाजक ओलांडला. पिंपरी चिंचवड परिसरात झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पिंपरीमधील मुख्य बाजारपेठेत ही घटना घडली. रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कुत्र्याला चालत्या रिक्षातून लाथ मारण्याचा प्रयत्न चालक करत असताना हा अपघात झाला. दुसरीकडे रिक्षा दुभाजक ओलांडून गेली. यावेळी तिथे उपस्थित काही नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने यावेळी कोणतंही वाहन जात नसल्याने मोठा अपघात टळला.
कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् रिक्षाचा अपघात झाला; रिक्षा चालकाला मिळालं 'कर्मा'चं फळ https://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/hSuK9QeIy6
— Lokmat (@MiLOKMAT) May 17, 2021
हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षा चालकाला पाय फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे दुभाजक आणि रिक्षा यांच्यात बरंच अंतर होतं. त्यामुळे रिक्षा चालकानं दुभाजकाच्या जरा जवळून रिक्षा नेली असती, तर हा प्रकार घडला नसता. पण कुत्र्याला लाथ मारण्यासाठी चालकानं रिक्षा त्याच्या जवळून नेली आणि अपघात झाला.