Relationship Viral Video: 'थ्रेडिंग-वॅक्सिंगने मी किंचाळलेले, बॉयफ्रेंडने तरीही...'; वंशिकाचा 'सिक्रेट' व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 17:29 IST2022-12-09T17:29:25+5:302022-12-09T17:29:53+5:30
समोरच्या तरुणीनीने तिला माझा एक मित्र आहे, जो तुझे फोटो पाहुन कोण आहे ही वंशिका असे सारखे विचारत असतो असे सांगितले. यावर देखील वंशिकाची रिअॅक्शन खतरनाक आहे.

Relationship Viral Video: 'थ्रेडिंग-वॅक्सिंगने मी किंचाळलेले, बॉयफ्रेंडने तरीही...'; वंशिकाचा 'सिक्रेट' व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तरुणीने तिच्या प्रेमाची कहानी सांगितली आहे. एका मैत्रिणीशी फोनवर बोलताना तिने बॉयफ्रेंडसोबतच्या सिक्रेट गोष्टी देखील सांगून टाकल्या आहेत. आता हा व्हिडीओ खरा आहे की खोटा तो तुम्हीच पहा. परंतू, हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. प्रेमभंग झालेली जी तरुणी आहे, तिचे नाव वंशिका आहे.
या व्हिडीओमुळे वंशिका देखील ट्रेंड होऊ लागली आहे. दोन तरुणी एकमेकांसोबत फोनवर बोलत आहेत. मोबाईलच्या स्क्रीनवर कॉल करणाऱ्या तरुणीचे नाव वंशिका असे दिसत आहे. ती रडत आहे आणि आकाश नावाच्या बॉयफ्रेंडचा उल्लेख करत आहे. ''दोन महिन्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी मी थ्रेडिंग आणि व्हॅक्सिंग केले. पार्लरवालीसमोर मी जोरजोरात किंचाळले. आकाशसाठी मी हाय हिल्सदेखील घातल्या. मात्र, त्याने रिलेशनशिपबाबत अद्याप शुअर नसल्याचे सांगत ब्रेक घेऊयात असे सांगितले'', असे ती म्हणत आहे.
कॉलेजमध्ये इतर मुलांना नाकारून आकाशला भाव दिल्याचे वंशिका तिच्या मैत्रिणीला सांगत आहे. त्याच्यासाठी महागडी हिल्स विकत घेतली. ब्रेकअप होणार हे मला माहीत असते, तर मी काही दिवस थांबले असते. मंत्रावर सेल लागला तेव्हा घेतल्या असत्या. किमान पैसे तर वाचले असते, असेही ती म्हणताना दिसत आहे.
यावर समोरच्या तरुणीनीने तिला माझा एक मित्र आहे, जो तुझे फोटो पाहुन कोण आहे ही वंशिका असे सारखे विचारत असतो असे सांगितले. यावर देखील वंशिकाची रिअॅक्शन खतरनाक आहे. तिचा हा फोनवरील ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तिच्या मैत्रिणीने तिला पुन्हा बोलण्यास सांगितले होते.
probably the funniest post-breakup crying session 😭😭 pic.twitter.com/tkac4bbgxs
— isHaHaHa (@hajarkagalwa) December 8, 2022