White deer Video : जरा विचार करा की, तुम्ही कारनं सहज रस्त्यानं फिरायला निघाले आणि अचानक तुमच्यासमोर असा दुर्मीळ प्राणी दिसेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. ही महिला सायंकाळी कारनं जंगलाच्या रस्त्यानं जात होती, तेव्हा तिला बर्फामध्ये उभं एक पांढरं हरीण दिसलं. हा अद्भूत नजारा बघून ती अवाक् झाली. महिलेनं काढलेला या पांढऱ्या हरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, हरणाला बघून असं वाटतं की, तो बर्फापासून तयार केला असावा किंवा एखाद्या परी कथेतील जीव जिवंत झाला असावा. हा व्हिडीओ एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. महिलेनं कॅप्शनला लिहिलं की, 'अविश्वसनीय आहे'. आपल्या गुलाबी डोळ्यांमुळे हे हरीण एल्बिनो आहे.
व्हिडीओ बघून लोक थक्क झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, 'काही सेकंदासाठी मला वाटलं की, ही बर्फाची हरणाची मूर्ती आहे'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'मी आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्यात सुंदर प्राण्यांपैकी एक'.
एल्बिनो हरीण
एल्बिनो हरीण जंगलातील सगळ्यात दुर्मीळ दृश्यांपैकी एक आहे. अशाप्रकारचं हरीण एक लाखात केवळ एकच जन्माला येतं. ओरिजनल एल्बिनो हरणांमध्ये मेलेनिन खूप कमी असतं. ज्यामुळे ते शुभ्र पांढरे दिसतात आणि त्यांचे डोळे गुलाबी असतात.
मात्र, अशाप्रकारचे हरीण जास्त काळ जिवंत राहणं अवघड असतं. एल्बिनो हरणाची दृष्टी खराब असते, ज्यामुळे ते इतर जंगली प्राण्यांचे लगेच शिकार होतात. इतिहासात पांढरं हरीण रहस्य आणि नशीबाचं प्रतीक मानलं जातं. यूरोपीय आणि सेल्टिक पौराणिक कथांमध्ये त्यांना अलौकिक प्राणी मानलं गेलं आहे. २०२३ मध्ये वाईल्ड लाइफ फोटोग्राफर ध्रुव पाटील यानं कर्नाटकच्या काबिनी जंगलात एका दुर्मीळ एल्बिनो हरणाचा फोटो काढला होता.