३० वर्षांनंतर राज ठाकरे-सोनाली बेंद्रे भेटले; सोशल मीडियात धडाधड व्हिडिओ फिरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:24 IST2025-03-01T12:23:34+5:302025-03-01T12:24:40+5:30

लोकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या व्हिडिओला खूप पसंतीही दिली आहे.

Raj Thackeray-Sonali Bendre met after 30 years; A heartwarming video went viral on social media! | ३० वर्षांनंतर राज ठाकरे-सोनाली बेंद्रे भेटले; सोशल मीडियात धडाधड व्हिडिओ फिरले!

३० वर्षांनंतर राज ठाकरे-सोनाली बेंद्रे भेटले; सोशल मीडियात धडाधड व्हिडिओ फिरले!

मुंबई - नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम रंगला. या सोहळ्याला मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्यातील सोनाली बेंद्रे यांच्या उपस्थितीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सिनेमा क्षेत्रातील कलाकारांसोबत चांगली मैत्री असल्याचं अनेकदा दिसून येते. बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरेंमधील मैत्री ही तशी फार जुनी आहे.

३० वर्षांनी हे दोघे एकत्र

१९९६ साली मुंबईत पहिल्यांदा मायकल जॅक्शनच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्र दिसून आले. त्यानंतर ३० वर्षांनी आज पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अभिजात मराठी या सोहळ्याला हे दोघे एकत्र दिसले. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियात बराच व्हायरल होत आहे. लोकांनी या दोघांच्या व्हिडिओला खूप पसंतीही दिली आहे. इतक्या वर्षांनीही या दोघांमधील मैत्री तशीच असल्याचं युजर्स म्हणत आहेत. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाकडून या काव्य वाचनाच्या या सोहळ्याचं आयोजन केले होते. त्यावेळी सोनाली बेंद्रे उपस्थित होत्या. सोनाली बेंद्रे, शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात खूप चांगल्या गप्पा रंगल्याचा व्हिडिओ पाहायला मिळाला. त्यानंतर व्यासपीठावर जाताना सोनाली बेंद्रे यांनी राज ठाकरेंना केलेला इशारा कॅमेऱ्यात टिपला गेला. हेच क्षण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 


सोनाली बेंद्रे यांनी जिंकली मने

दरम्यान, मराठी भाषा गौरव दिनाच्या या सोहळ्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रने स्टेजवर येत मराठीतून भाषण करत सर्वांचं मन जिंकलं. ती म्हणाली, "नमस्कार! आज इथे महाराष्ट्राच्या अनेक दिग्गज व्यक्तींसमोर मी उभी आहे. माझी गणना इथे होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. पण सुरुवातीलाच एक कबुली देते. मी स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला थोडीशी संकोचते. कारण माझा जन्म जरी बेद्रेंची सोनाली म्हणून झाला असेल तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझं संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेलं. आम्ही इतक्या वेळा घरं बदलली की घरचा पत्ता पूर्ण लिहिण्याच्या आधी आम्ही पुढच्या शिफ्टिंगचा विचार करायचो, पण या सगळ्यात एक गोष्टीत कोणतीही तडजोड नव्हती तो म्हणजे आमच्या घरातला मराठी बाणा. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी झाले तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं. त्यामुळे १०० टक्के महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे असं सोनाली यांनी म्हटलं. 

 

Web Title: Raj Thackeray-Sonali Bendre met after 30 years; A heartwarming video went viral on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.