शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 22:04 IST

Railway Station Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Railway Station Viral Video:  रेल्वे स्टेशनवर समोसा विकणाऱ्या एका वेंडरने प्रवाशावर दादागिरी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २० रुपयांच्या समोशासाठी वेंडरने प्रवाशाची २ हजार रुपयांची स्मार्टवॉच हिसकावून घेतल्याचे व्हिडिओत दिसते. 

नेमकं काय घडलं?

ही घटना १७ ऑक्टोबरच्या संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जबलपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर घडली. एका प्रवाशाने ट्रेनमधून उतरून समोसे घेतले आणि UPI पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रान्झॅक्शन फेल झाले. यादरम्यान, ट्रेन सुटायला लागली, त्यामुळे प्रवाशाने समोसे परत देण्याचा प्रयत्न केला. पण वेंडर एवढा चिडला की, त्याने प्रवाशाचा कॉलर पकडला आणि ओरडला-  “टाइम वेस्ट करू नका, पैसे दे.”

२० रुपयांच्या समोसासाठी २ हजारांची स्मार्ट वॉच घेतली

ट्रेन सुटण्याच्या भीतीने घाबरलेल्या प्रवाशाने आपली स्मार्टवॉच काढून वेंडरला दिली. वेंडरने त्याला दोन प्लेट समोसे देऊन सोडून दिले. या संपूर्ण घटनेचा ३४ सेकंदांचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, प्रवासी UPI फेल झाल्याचं सांगत असतानाही वेंडर ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी प्रवाशाने २ हजार रुपयांची स्मार्टवॉच देऊन सुटका करून घेतली.

आसपासचे लोक सगळं पाहत होते, काही जण व्हिडिओ शूट करत होते, पण कोणीही हस्तक्षेप केला नाही. या प्रकारानंतर प्रवासी सुरक्षा आणि रेल्वे स्टेशनवरील अनधिकृत वेंडर्सबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

रेल्वे प्रशासनाने तत्काळ घेतले अ‍ॅक्शन

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ कारवाई केली. जबलपूर विभागाचे डीआरएम यांनी X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट करून सांगितले की, “वेंडरची ओळख पटली आहे. त्याला RPF (रेल्वे सुरक्षा दल) ने ताब्यात घेतले असून त्याच्यावर केस दाखल केली आहे. त्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

नेटिझन्सनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, “व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की प्रवासी समोसे घेऊ इच्छित नाही, तरीही वेंडर जबरदस्ती करत आहे.” दुसऱ्याने म्हटलं, “डिजिटल पेमेंटवर एवढा भरोसा नको, जवळ कॅश ठेवावी.” 

English
हिंदी सारांश
Web Title : Vendor's Bullying: Samosa for Smartwatch at Railway Station!

Web Summary : A samosa vendor at Jabalpur station forcibly took a passenger's smartwatch for a ₹20 samosa after a failed UPI transaction. Railway authorities have identified and arrested the vendor, initiating license cancellation. The incident sparked outrage online.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे