'त्याने' फोन नंबर मागितला, 'तिने' चप्पलेने धू धू धुतला; 'थप्पड गर्ल'नंतर 'चप्पल गर्ल'चा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 10:00 AM2021-09-08T10:00:20+5:302021-09-08T10:08:48+5:30

Viral Video : तरुणीने रोडरोमिओला चांगलीच अद्दल घडवली आहे. तरुणाला तिने भररस्त्यात चपलेने धू धू धुतलं आहे.

raebareli chappal girl manchala was beaten up in the middle of the road | 'त्याने' फोन नंबर मागितला, 'तिने' चप्पलेने धू धू धुतला; 'थप्पड गर्ल'नंतर 'चप्पल गर्ल'चा Video व्हायरल

'त्याने' फोन नंबर मागितला, 'तिने' चप्पलेने धू धू धुतला; 'थप्पड गर्ल'नंतर 'चप्पल गर्ल'चा Video व्हायरल

Next

नवी दिल्ली - महिलेची छेड काढणं, तिचा मोबाईल नंबर मागणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. काही दिवसांपूर्वीच "थप्पड गर्ल"चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता "चप्पल गर्ल"चा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एका तरुणीने रोडरोमिओला चांगलीच अद्दल घडवली आहे. तरुणाला तिने भररस्त्यात चपलेने धू धू धुतलं आहे. मोबाईल नंबर मागणाऱ्या तरुणाची पायातील चप्पल काढून धुलाई केली आहे. तरुणीने हा व्यक्ती आपली छेड काढत असल्याचा आरोप केला आहे. तर त्या व्यक्तीने आपण काहीच केलं नसून निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. 

डलमऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोह गावात राहणारी तरुणी आपल्या काही कामासाठी बाहेर आली होती. काम झाल्यानंतर ती घरी परतत होती. त्यावेळी रस्त्यात एक तरुण तिचा पाठलाग करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने तिच्यासोबत गैरवर्तन केलं, तिची छेड काढण्यास सुरुवात केली. काही वेळाने त्याने तरुणीकडे तिचा मोबाईल नंबर मागण्यास सुरुवात केली. तिचा पाठलाग करत तो घुरवारा चौकीपर्यंत पोहोचला. यानंतर तरुणीने थेट आपल्या पायातली चप्पल काढली आणि तरुणाला भरस्त्यात चोपायला सुरुवात केली.  

भररस्त्यात चप्पलेने 'तिने' केली यथेच्छ धुलाई

तरुणीला असं तरुणाला मारताना पाहून रस्त्यात लोक मोठ्या संख्येने जमा झाले. तिथे आले. त्यांनी त्या दोघांनाही समजावलं. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणीने चप्पलेने मारताना दिसत आहे. तरुणीने जे धाडस दाखवलं त्यासाठी तिच्या हिमतीला दाद दिली जाते आहे. सर्वत्र तिचं कौतुक केलं जातं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: raebareli chappal girl manchala was beaten up in the middle of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app