(Image Credit : travelweekly.com.au)
ते म्हणतात ना की, स्वप्ने नेहमी मोठी असावीत. कारण तुम्हाला हे माहीत नसतं की, कधी तुमची स्वप्ने खरी होतील. असंच काहीसं एका १० वर्षीय ऑस्ट्रेलियातील मुलासोबत झालंय. १० वर्षीय अॅलेक्स जॅक्वॉटला त्याची एअरलाइन सुरू करायची आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की, हे कसं करावं.
यासाठी ऑस्ट्रेलियातील सर्वात जुनी एअरलाइन्स क्वांटस (Qantas Airlines) चे सीईओ अॅलन जॉयस यांना अॅलेक्स जॅक्वॉयने पत्र लिहिलं आणि स्वत:ची एअरलाइन्स सुरू करण्याबाबत विचारपूस केली. ज्यावर क्वांटस एअरलाइन्सच्या सीईओने अॅलेक्सच्या पत्राला उत्तर देत सांगितले की, तो कशाप्रकारे स्वत:ची एअरलाइन कंपनी सुरू करू शकतो आणि ती यशस्वीपणे मोठीही करू शकतो.
Qantas Airlines ने अॅलेक्स जॅक्वॉट आणि सीईओ अॅलन जॉयसच्या या पत्राला Qantas Airlines च्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं. त्यानंतर याची जोरदार चर्चा होऊ लागली. कारण याबाबत कुणी कधी विचारच केला नसेल की, एका मोठी एअरलाइन कंपनी १० वर्षांच्या मुलाच्या प्रश्नाला इतक्या गंभीरतेने घेतील आणि त्यावर उत्तरही देतील.
या लहान मुलाच्या पत्राला उत्तर देत Qantas Airlines चे सीईओ अॅलन जॉयस यांनी लिहिले की, 'आमचे स्पर्धक सामान्यपणे आमच्याकडून सल्ला मागत नाहीत. पण जेव्हा एखाद्या एअरलाइन्सचा मुख्य स्वत: आम्हाला काही विचारतो तेव्हा आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. सामान्यपणे प्रतिक्रिया देण्याची एकच पद्धत आहे CEO To CEO.'
त्यानंतर सीईओ अॅलन जॉयस यांनी ओसेनिया एक्सप्रेसचा १० वर्षीय अॅलेक्स जॅक्वॉटची भेट घेतली. यादरम्यान एअरक्राफ्ट, इन-फ्लाइट कॅटरिंग आणि लांब उड्डाणांबाबत चर्चा झाली. दोघांमध्ये एक एमओयू(करार) सुद्धा झाला. या करारानुसार, क्वांटस एअरलाइन आणि ओसेनिया एक्सप्रेस २०२६ मध्ये एकमेकांना सहकार्य करतील. तोपर्यंत अॅलेक्सचं कॉलेज शिक्षण पूर्ण होईल.
मीटिंगनंतर जॉयस म्हणाला की, अॅलेक्सने मला सांगितलं होतं, आम्ही त्याला गंभीरतेने घ्यावं. आम्ही तेच केलं. त्याचा उत्साह पाहून आम्हीही प्रभावित झालोत. अॅव्हिएशन इंडस्ट्रीबाबत मोठा विचार करणाऱ्या लोकांची गरज आहे. अॅलेक्समध्ये ती खास गोष्ट आहे. ओसेनिया एक्सप्रेसचा फाऊंडर आणि सीईओ अॅलेक्स म्हणाला की, आमच्यासाठी हा मोठा दिवस होता. आम्ही क्वांटसकडून खूपकाही शिकलो. पण तेही आमच्याकडून शिकू शकतात. अॅलेक्सचा उत्साह पाहून ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठ्या एअरलाइनने फ्यूचर हाय फ्लायर्स प्रोग्राम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, नवी एअरलाइन सुरू करणाऱ्या ७ ते १० वर्षांच्या मुलांना एअरलाइन्सच्या आतील कामकाजाचे मुद्दे शिकवले जातील.
या मीटिंगसोबतच अॅलेक्स आणि त्याच्या साथीदारांना क्वांटसच्या इंजिनिअरींग सुविधा आणि एअरबस बघण्याची संधी मिळाली. मुलांनीही क्वांटसच्या पायलट्स आणि इंजिनिअर्ससोबत भेट घेतली. तसेच क्वांटसने जॅक्वॉटच्या नव्या एअरलाइन्सचा लोगो आणि बिझनेस कार्डही गिफ्ट केलं. त्यांचा ओसेनिया एक्सप्रेस ब्रॅन्ड ड्रीमलायनर विमानावर कसा लागेल याचाही लूक दाखवण्यात आला. अॅलेक्सने गेल्या महिन्यात जॉयसला पत्र लिहिण्यावरून चर्चेत आला होता. मुलाने जॉयसला लिहिले होते की, मला ओसेनिया एक्सप्रेस एअरलाइन सुरू करायची आहे. एक सीईओ म्हणून हे चांगल्याप्रकारे करण्यासाठी मी काय करायला हवं.