आलू पराठा सॉंग! एका परिवाराने आलू पराठ्यावर बनवलं टेस्टी गाणं, ऐकूनच तोंडाला सुटेल पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 13:25 IST2024-09-28T13:18:18+5:302024-09-28T13:25:22+5:30
Aloo Paratha Song : अनेकांच्या आवडीच्या आलू पराठ्यावर एक जबरदस्ती गाणं समोर आलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आलू पराठ्या इतकंच टेस्टी हे गाणंही झालं आहे.

आलू पराठा सॉंग! एका परिवाराने आलू पराठ्यावर बनवलं टेस्टी गाणं, ऐकूनच तोंडाला सुटेल पाणी!
Aloo Paratha Song : आलू पराठे भारतातील लोक फार आवडीने खातात. अनेकांच्या रोजच्या नाश्त्यातील ही डिश असते. लहान मुले असो वा मोठे सगळ्यांनाच आलूचे पराठे खूप आवडतात. पंजाबी लोक तर आलूचे पराठे खूप जास्त खातात. आलूचे पराठे, त्यावर लोणी आणि दही हे कॉम्बिनेशन तर तोंडाला पाणी सोडणारं असंच आहे. आता याच अनेकांच्या आवडीच्या आलू पराठ्यावर एक जबरदस्ती गाणं समोर आलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आलू पराठ्या इतकंच टेस्टी हे गाणंही झालं आहे.
इन्स्टाग्रामवर सनमीत कौर नावाच्या हॅंडलवर हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये एक सरदार फॅमिली दिसत आहे. त्यांच्या हातात प्लेटही आहे आणि ते आलू पराठे खात खात गाणंही गात आहेत. पुढे एक तरूण माइकवर गाणं गात आहे. गाणं एकदम सुरात आणि चालीत आहे. यात आलूच्या पराठे, लोणी, दही यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच हेही सांगितलं की, डायटिंगचा नाद सोडून आलू पराठे खाल्ले पाहिजेत.
या वेगळ्या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत ४ लाख १ हजार ३५ लोकांनी लाइक केलं आहे. अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करून काही सूचनाही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'या गाण्यात चहाचा सुद्धा उल्लेख व्हायला हवा'. दुसऱ्याने लिहिलं की, 'हे गाणं इतकं चांगलं आहे की, दलजीत सिंगच्या कॉन्सर्टमध्ये गायलं गेलं पाहिजे'. अशा वेगवेगळ्या कमेंट्स लोक करत आहेत.