लग्न दीपिका-रणवीरचं झालं, पण व्हायरल ही नवरी झाली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 14:41 IST2018-11-22T14:40:05+5:302018-11-22T14:41:56+5:30
बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचं नुकतंच लग्न झालं. त्यानंतर त्यांचे कितीतरी फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

लग्न दीपिका-रणवीरचं झालं, पण व्हायरल ही नवरी झाली!
बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचं नुकतंच लग्न झालं. त्यानंतर त्यांचे कितीतरी फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अशातच दरम्यान सोशल मीडियात एका दुसऱ्या नवरीचे फोटोही व्हायरल होत आहेत. या नवरीला 'साडी ज्युलिएट' म्हटले जात आहे.
इंग्रजी वेबसाइट्स या नवरीला 'Snow women Bride' म्हणत आहेत. या फोटोत एक बर्फाने तयार केलेली नवरी आहे. या नवरीला लाल दुपट्टा आणि काही ज्वेलरीने सजवली आहे. ही नवरी जासु किंगराने तयार केली आहे. जासु व्यवसायाने एक मेक-अप आर्टीस्ट आहे.
जासूने इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट करत लिहिले की, 'माझी मैत्रिण दलजीत भारतातून ब्रॅम्पटनला आली आहे. येथील तिची ही पहिली थंडी आहे. तिने मला सांगतिले की, मला एक स्नोमॅन तयार करायचा आहे. पण मी तिला तिच्या घराबाहेर स्नोवुमन तयार करुन दिली'.
जासूने स्नोवुमनचा फोटो शेअर केल्यावर लगेच हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. लोक या साडी ज्यूलिएटचे फॅन झाले आहेत. ट्विटरवरही या फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे. वेगवेगळे कॅप्शन या फोटोला दिले जात आहेत.