सॅल्यूट! अर्ध्या रात्री डॉक्टर 'ड्रायव्हर' बनला अन् रुग्णाला जीवदान दिलं; 'अशी' धडपड पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 05:49 PM2020-08-25T17:49:59+5:302020-08-25T18:05:37+5:30

क्टरांनी कसलाही विचार न करता  रुग्णवाहिकेचं स्टेअरिंग हातात घेतलं आणि रुग्णाला तात्काळ घेऊन निघाले. डॉक्टरांनी दाखवलेल्या या प्रसंगावधनामुळे या रुग्णाचे प्राण वाचले आहेत.

Pune dr ranjeet nikam save life of patient in covid 19 center by driving ambulance | सॅल्यूट! अर्ध्या रात्री डॉक्टर 'ड्रायव्हर' बनला अन् रुग्णाला जीवदान दिलं; 'अशी' धडपड पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

सॅल्यूट! अर्ध्या रात्री डॉक्टर 'ड्रायव्हर' बनला अन् रुग्णाला जीवदान दिलं; 'अशी' धडपड पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

googlenewsNext

 पुणे- रविवारी २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका रुग्णाची प्रकृती खालावली. या रुग्णाचं वय ७१ वर्ष इतकं होतं.  जीव वाचवण्यासाठी या रुग्णाला  लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं.  रात्रीचे ३ वाजले होते. त्यात रुग्णवाहिकेचा चालक उपस्थित नव्हता. रुग्णाची गैरसोय होऊ नये आणि वेळेत उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांनी कसलाही विचार न करता  रुग्णवाहिकेचं स्टेअरिंग हातात घेतलं आणि रुग्णाला तात्काळ घेऊन निघाले. डॉक्टरांनी दाखवलेल्या या प्रसंगावधनामुळे या रुग्णाचे प्राण वाचले आहेत.

या कामगिरीबद्दल डॉ. रणजीत निकम आणि डॉ. राजपुरोहित यांचे कौतुक केलं जात आहे. दोघंही विलगीकरण केंद्रात काम करत होते. त्याचवेळी  ७१ वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. या रुग्णाला तात्काळ दवाखान्यात दाखल करावं लागणार  होतं. अशात प्रकृती बरी नसल्यानंतर रुग्णवाहिकेचा चालक उपस्थित नव्हता. इतर ड्रायव्हरर्सशीही संपर्क होऊ शकला नाही. १०८ क्रमांकावर फोन केला तर तिथंही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती.

या रुग्णाचे नातेवाईकही या सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी दुसरं कुणीच नव्हतं. अशावेळी डॉक्टरांनी पुढे येत मदतीचा हात देऊन तात्काळ आयसीयूमध्ये हलवलं.  कसलाही विचार न करता डॉक्टरांनी रुग्णवाहिकेचं स्टेअरिंग आपल्या हाती घेतलं आणि दीनानाथ रुग्णालयातून थेट सह्याद्री रुग्णालयात पोहोचले.

तिथे बेड उपलब्ध नसल्याने त्यांनी अ‍ॅम्ब्युलन्स पुन्हा दुसऱ्या रुग्णालयाकडे वळवली आणि अखेर रुग्णाला तिथं दाखल करण्यात आलं. डॉ. निकम यांनी हा व्हिडीओ आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. डॉक्टरांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी या  कोरोनायोद्ध्यांना त्यांच्या कार्याबद्दल सलाम केला आहे. 

हे पण वाचा-

खोदकाम करताना सापडलीत ११०० वर्षे जुनी सोन्याची दुर्मीळ नाणी, बघा फोटो...

सलाम! कधीही विसरणार नाही रात्रंदिवस राबणाऱ्या कोरोनायोद्ध्याचं बलिदान; मन हेलावून टाकणारा फोटो

Web Title: Pune dr ranjeet nikam save life of patient in covid 19 center by driving ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.