खोदकाम करताना सापडलीत ११०० वर्षे जुनी सोन्याची दुर्मीळ नाणी, बघा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 02:08 PM2020-08-25T14:08:40+5:302020-08-25T14:16:58+5:30

'टाइम्स ऑफ इस्त्राइल' ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही नाणी साधारण ११०० वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. इथे सोन्याची एकूण ४२५ नाणी सापडली आहेत.

अनेकदा खोदकाम करताना काही अशा वस्तू सापडतात की सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक नजारा इस्त्राइलमध्ये बघायला मिळाला. इथे सुरू असलेल्या एका खोदकामावेळी ११०० वर्ष जुनी दुर्मीळ नाणी सापडली आहेत. (Photo Credit : YouTube- Israel Antiquities Authority Official Channel)

इस्त्राइलच्या पुरातत्व खात्याने सोमवारी घोषणा केली की, त्यांना यवने शहराजवळ खोदकाम करताना इस्लामी काळातील सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडलाय.

टाइम्स ऑफ इस्त्राइल' ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही नाणी साधारण ११०० वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. इथे सोन्याची एकूण ४२५ नाणी सापडली आहेत.

इस्त्राइलचे पुरातत्ववादी लियात नादाव-जिव आणि एली हद्दाद यांनी संयुक्तपणे सांगितले की, खोदकाम करताना ४२५ नाणी सापडली आहेत. जी पूर्णपणे सोन्याची आहेत. यातील जास्तीत जास्त जवळपास १,१०० वर्षाआधीच्या अब्बादिस काळातील नाणी आहेत.

नाणी सापडलेल्या तरूणाने सांगितले की, तो नजारा अद्भूत होता. मी खोदकाम करताना पाहिले की पितळेसारखं काहीतरी दिसतंय. नंतर मी पाहिलं तर ती सोन्याची नाणी होती. खरंच रोमांचक अनुभव होता.

येथील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, असा अंदाज आहे की, ही एखाद्या व्यक्तीने १,१०० वर्षाआधी नाणी जमिनीत गाडल्या असतील. ही नाणी ज्या भागात सापडलीत त्या जागेवर त्या काळात बाजार होता.