Prince philip funeral topless woman shouting save planet arrested at windsor castle | Topless woman Video : जोरजोरात ओरडत महिलेनं रस्त्यावरच उतरवले कपडे; शोकसभेत घातला गोंधळ, समोर आला व्हिडीओ

Topless woman Video : जोरजोरात ओरडत महिलेनं रस्त्यावरच उतरवले कपडे; शोकसभेत घातला गोंधळ, समोर आला व्हिडीओ

ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स फिलीप यांच्या अंत्ययात्रेच्यावेळी एका महिलेनं चांगलाच गोंधळ घातला आहे. असा विचित्र प्रकार तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या महिलेला भर रस्त्यात रोखणं पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण जेव्हा पोलिस या महिलेला पकडायला गेले तेव्हा ती अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. 

प्रिन्स फिलीप यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अगोदर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये बरेच लोक उपस्थित होते. शोकसभा चालू असताना अचानक ही महिला पळू लागली आणि जोरात ओरडू लागली. महिला अचानक ओरडली. तेव्हा सुरुवातीला कोणालाही काही समजले नाही. ही महिला 'सेव्ह प्लॅनेट', सेव्ह प्लॅनेट असे म्हणून ओरडत होती.  त्यानंतर रस्त्यावर धाव घेतली आणि तेथे पोचताच आपले सर्व कपडे काढले. ही महिला पूर्ण टॉपलेस झाली होती, त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांनी तिला ताबडतोब अटक केली आणि तिच्या अंगावर कापड टाकून तिचे अंग झाकण्याचा प्रयत्न केला. एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

या प्रकारामुळे सर्वच लोक अवाक झाले, नक्की काय झालंय कोणालाच काही काळलं नाही. सुरक्षा दलाने महिलेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तिने तेथे उपस्थित राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्यावर उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. पोलिसांनी महिलेला पांढर्‍या कपड्यांनी झाकले आणि त्यानंतर तेथून तिला नेले. महिलेची आरडा-ओरड पाहून लोकांची गर्दी करायला सुरूवात केली. बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prince philip funeral topless woman shouting save planet arrested at windsor castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.