रस्त्याच्या कडेला कार थांबलेली आहे. बाजूला वाहतूक पोलीस उभा आहे. तो कारमधील माणसाजवळ येतो आणि त्यांच्या बोलणं सुरू आहे, असे सगळं दिसत असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाठीमागे उभ्या असलेल्या कारमधील लोकांनी चित्रित केला. व्हिडीओ शेअर करणाऱ्याने दावा केला की, सीट बेल्ट नसल्यामुळे पोलिसाने कार थांबवली. पण, त्याने थेट लाच मागितली.
गुजरातच्या कार चालकाने सीमेवर महाराष्ट्र पोलिसांना उघड पाडलं आहे. व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, सीटबेल्ट नसल्याने पोलिसांनी कार थांबवली. पण, त्याने ५०० रुपये देण्याची मागणी केली. त्यासाठी चालकाला चलनही दिले गेले नाही.
एका यूजरने म्हटले आहे की, नक्कीच याची सीमेवर दारू पकडली गेली असेल, तेव्हा याने त्यांना उघड पाडलं. रोख रक्कम जिथे येते तिथे कायद्याचे राज्य संपते. एका यूजरने म्हटले आहे की, मला हे प्रत्येक टोल आणि नाक्यावर हफ्ता वसूल करताना दिसतात.
हा व्हिडीओ इतर काही लोकांनीही सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
Web Summary : A video shows a Gujarat driver accusing Maharashtra police of demanding a bribe at the border for a seatbelt violation instead of issuing a fine. The police have yet to respond.
Web Summary : एक वीडियो में गुजरात के एक ड्राइवर ने महाराष्ट्र पुलिस पर सीटबेल्ट उल्लंघन के लिए जुर्माना जारी करने के बजाय सीमा पर रिश्वत मांगने का आरोप लगाया है। पुलिस की ओर से अभी तक कोई प्रतिक्रिया नहीं आई है।