रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 23:10 IST2025-10-27T22:41:39+5:302025-10-27T23:10:25+5:30
कटिहार जिल्ह्यातील एका रेस्टॉरंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये पोलिस एका तरुणाशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. या प्रकरणी बारसोई एसओला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील एका रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या भाऊ आणि बहिणीसोबत पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बारसोई येथील एका रेस्टॉरंटमध्ये तो तरुण जेवायला गेला होता. बारसोई एसओ पोलिसांसह तेथे पोहोचले आणि त्या दोघांसोबत गैरवर्तन केले.
एका प्रेस रिलीजमध्ये पोलिसांनी यावर भाष्य केले आहे. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर एसओला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बारसोई पोलिस स्टेशनच्या प्रमुखांना माहिती मिळाली होती की काही असामाजिक घटक ब्लॉकच्या नगर पंचायतीतील रास चौक जवळील एका रेस्टॉरंटला भेट देत आहेत. तपास करण्यासाठी एसओ रामचंद्र मंडल त्यांच्या टीमसह रेस्टॉरंटमध्ये गेले. तपासादरम्यान एसओ आणि तिथे बसलेल्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकरणात बारसोई पोलिस स्टेशनच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून विभागीय कारवाई केली जाईल.
व्हायरल व्हिडिओमध्ये यश अग्रवाल त्याच्या बहिणी आणि इतरांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला स्पष्ट दिसतो. स्टेशन हाऊस ऑफिसर त्याला विचारतो की ती कोण आहे. यश उत्तर देतो की ती त्याची बहीण आहे. स्टेशन हाऊस ऑफिसर रामचंद्र संतापले आणि विचारतात, "तू इतक्या जोरात का बोलत आहेस? तुझा स्वर योग्य नाही." यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होतो, याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.