विषारी साप असा आपल्या शिकारीचा खेळ करतो खल्लास, व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:03 IST2022-09-19T17:01:54+5:302022-09-19T17:03:56+5:30
Social Media Viral: या व्हिडीओत एक विषारी सापाचं फारच भयानक रूप बघायला मिळालं. सोशल मीडियावर सापांचे अनेक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण या व्हिडीओची बातच वेगळी आहे.

विषारी साप असा आपल्या शिकारीचा खेळ करतो खल्लास, व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा!
Social Media Viral: सोशल मीडियावर नेहमीच काही खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटतं तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. अशाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओत एक विषारी सापाचं फारच भयानक रूप बघायला मिळालं. सोशल मीडियावर सापांचे अनेक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण या व्हिडीओची बातच वेगळी आहे.
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, साप आपल्या विषाने काही सेकंदात कुणाचाही खेळ खल्लास करू शकतो. पण नक्कीच तुम्हीच अशाप्रकारचा व्हिडीओ पाहिला नसेल. आधी तर तुम्ही व्हायरल झालेला हा भारी व्हिडीओ बघा.
या व्हिडीओत साप त्याच्या विषाने हल्ला करताना दिसत आहे. व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे की, साप जसा त्याच्या तोंडातून विष काढतो, त्याची धार हवेत खूप दूर जाते. काही साप तर इतके खतरनाक असतात की, त्यांच्या विषाचा एक थेंबच जीव घेण्यासाठी पुरेसा असतो.
हा व्हिडीओ यूटूयूबव अपलोड करण्यात आला आहे. अर्थातच तुम्हाला सापाचा विषाने हल्ला करतानाचा असा स्लो मोशन व्हिडीओ बघितला नसेल. त्यामुळेच हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे. लोक या व्हिडीओला भरभरून लाइक करत आहे तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंटही करत आहेत.