PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 18:41 IST2020-12-31T18:31:40+5:302020-12-31T18:41:29+5:30
Trending Video in Marathi : मोदींची जबरदस्त फॅन असलेल्या आजींनी त्यांच्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी खास गाणं गायलं आहे.

PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL
कोरोना व्हायरसनं कहर केल्यामुळे सगळ्यांनाच २०२० मध्ये गंभीर आणि कधीही न उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. आता येणारं वर्ष सगळ्यांना सुखा, समाधानाचं जावं यासाठी संकल्प केले जात आहेत. नवीन वर्ष चांगलं आणि माहामारीच्या संकटातून सावरणारं असावं यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. दरम्यान मोदींची जबरदस्त फॅन असलेल्या आजींनी त्यांच्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी खास गाणं गायलं आहे. आजींचं हे गाणं सोशल मीडियावर काही मिनिटांत इतकं तुफान व्हायरल झालं की त्या जगभरात प्रसिद्ध झाल्या आहेत.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या आजींचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या गाण्यात आजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी स्तुती सुमनं वाहिली आहेत. पंतप्रधानांच्या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर आजींनी त्यांना गाण्याद्वारे १०० वर्षे जगण्याचे आशीर्वाद दिले आहेत. गाण्यामध्ये आजींना ज्या योजनांचा लाभ मिळाला त्याचा उल्लेख देखील त्यांनी केला आहे. New Year 2021 : माहामारीची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं; कसं असेल नववर्ष २०२१
समोर आलेल्या माहितीनुसार या आजींनी गाण्यात पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, कन्या विवाह योजना, जन धन खात्यासह अनेक योजनांचा उल्लेख केला आहे. घर, गॅस आणि विजेचे कनेक्शन, मुलीचे लग्न आणि तिच्या आयुष्यात तिच्या खात्यात पैसे कसे आले.
इतकेच नव्हे तर लॉकडाऊनच्या काळात त्यांना विनामूल्य रेशन मिळालं. हे सुद्धा या आजींनी गाण्याच्या माध्यमातून सांगितले आहे. या सगळ्यात मोदींना श्रेय देत त्यांचं कौतुक करत गायलेल्या गाण्याचा या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...