क्रिकेट प्रेमींच्या जीवाशी खेळ; उरलेलं कोल्ड्रिंक पुन्हा बाटल्यात भरलं, दिल्लीतील स्टेडियमचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:35 IST2026-02-12T14:34:23+5:302026-02-12T14:35:07+5:30

दिल्लीत अरूण जेटली स्टेडियमवर प्रेक्षकांनी प्यायलेले शीतपेय पुन्हा बाटल्यांमध्ये भरलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Playing with the lives of cricket lovers; Leftover cold drink refilled in bottles, video of Delhi stadium goes viral | क्रिकेट प्रेमींच्या जीवाशी खेळ; उरलेलं कोल्ड्रिंक पुन्हा बाटल्यात भरलं, दिल्लीतील स्टेडियमचा व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट प्रेमींच्या जीवाशी खेळ; उरलेलं कोल्ड्रिंक पुन्हा बाटल्यात भरलं, दिल्लीतील स्टेडियमचा व्हिडिओ व्हायरल

भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली सध्या आयसीसी टी२० विश्वचषकाची स्पर्धा सुरु आहे. मात्र, दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर एक संतापजनक प्रकार समोर आला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. स्टेडियममधील खाद्यपदार्थ आणि पेये विक्री करणाऱ्या केंद्रावर उरलेले शीतपेय पुन्हा बाटल्यांमध्ये भरून विकले जात असल्याचा खळबळजनक आरोप एका प्रेक्षकाने केला आहे.

नेमकी घटना काय?

१० फेब्रुवारी रोजी अरुण जेटली स्टेडियमवर नेदरलँड विरुद्ध नामिबिया हा सामना पार पडला. सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर पडत असताना एका प्रेक्षकाला अत्यंत घाणेरडा प्रकार दिसला. स्टेडियममधील काही कर्मचारी प्रेक्षकांनी अर्धवट सोडून दिलेले किंवा उरलेले थम्स अप गोळा करत होते. हे उरलेले शीतपेय एका मोठ्या कॅरेटमध्ये जमा करून पुन्हा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरले जात होते.

व्हिडिओमध्ये काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कर्मचारी उरलेले कोल्ड्रिंक पुन्हा बाटल्यांमध्ये भरताना स्पष्ट दिसत आहेत. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने म्हटले की, "अरुण जेटली स्टेडियममध्ये थम्स अपच्या उरलेल्या बाटल्या पुन्हा भरल्या जात आहेत. पुढच्या सामन्यात या जुन्याच बाटल्या पुन्हा विकल्या जातील. हा सरळ सरळ स्कॅम सुरू आहे."

आरोग्याला मोठा धोका; नेटकऱ्यांचा संताप

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ११ आणि १२ फेब्रुवारी दरम्यान सोशल मीडियावर तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. नेटकऱ्यांनी याला निष्काळजीपणा आणि आरोग्याशी खेळ असल्याचे म्हटले आहे. उरलेले शीतपेय पुन्हा भरल्यामुळे त्यात लाळ मिसळली गेली असेल आणि संसर्गजन्य रोग पसरण्याचा मोठा धोका आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि कोका-कोला इंडिया यांनी यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.

प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची प्रतीक्षा

वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत अशा प्रकारचा अस्वच्छतेचा आणि फसवणुकीचा प्रकार समोर आल्याने स्टेडियमच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अद्याप डीडीसीए किंवा अधिकृत कंपन्यांनी यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, या व्हिडिओमुळे क्रिकेट प्रेमींमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

Web Title : दिल्ली स्टेडियम: क्रिकेट प्रेमियों के लिए ख़तरा, बेचे जा रहे कोल्ड ड्रिंक

Web Summary : अरुण जेटली स्टेडियम में थम्स अप की बोतलों में बचा हुआ पेय भरकर बेचने का मामला सामने आया है। इस अस्वच्छ प्रथा से प्रशंसकों के स्वास्थ्य पर गंभीर खतरा मंडरा रहा है, जांच की मांग उठी है।

Web Title : Delhi Stadium: Recycled Cold Drinks Sold, Endangering Cricket Fans

Web Summary : Arun Jaitley Stadium faces scrutiny after a video surfaced showing staff refilling Thumbs Up bottles with leftover drinks. This unsanitary practice raises serious health concerns among fans, prompting calls for investigation and action.