या फोटोतील वाघांची संख्या किती? बीग बींनी शोधले 'इतके' वाघ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 13:35 IST2020-04-24T13:12:09+5:302020-04-24T13:35:55+5:30
सर्वसाधारण माणसांपासून, सेलिब्रिंटीपर्यंत सगळेजण या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत.

या फोटोतील वाघांची संख्या किती? बीग बींनी शोधले 'इतके' वाघ...
सध्या सोशल मीडियावर एका फोटोने धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेक लोक एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अलिकडे ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जंगलात बसलेले वाघ दिसत आहेत. या फोटोत नेमके किती वाघ आहेत. याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे.
हा फोटो @isharmaneer याने ट्विटरवर शेअर केला आहे. सर्वसाधारण माणसांपासून, सेलिब्रिंटीपर्यंत सगळेजण या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. सुरूवातीला लोकांना यात ४ वाघ दिसले. नीट नजरेला ताण देऊन पाहिल्यानंतर १० पेक्षा जास्त वाघ दिसले आहेत. तुम्हीसुद्धा बारकाईने पाहाल तर तुम्हाला अनेक वाघ दिसून येतील. वाघ आणि वाघाचे बछडे या जंगलात बसलेले आहेत.
How Many Tigers You See In This Pic ? pic.twitter.com/GPOvxKYdRc
— EF Neer 🇮🇳 (@isharmaneer) April 22, 2020
दिया मिर्झा, अमिताभ बच्चन, प्राची देसाई या कलाकारांनी फोटोतील वाघांची संख्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो २३ एप्रिलला ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. सध्या हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत या ट्विटला ६ हजारांहून अधिक जणांनी लाइक केले आहे. तर, ३ हजारांपेक्षा अधिक जणांनी या फोटोवर वर कंमेट केली आहे.