Video : ‘जन गण मन’चं पियानो व्हर्जन सोशल मीडियात व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 13:13 IST2018-08-08T13:08:58+5:302018-08-08T13:13:51+5:30
स्वातंत्र्य दिन काही दिवसांवरच आहे. सिग्नलवर तिरंग्याची विक्रीही सुरु झाली आहे. अशात सोशल मीडियावरही स्वातंत्र्य दिनाबाबत काही गोष्टी व्हायरल होत आहेत.

Video : ‘जन गण मन’चं पियानो व्हर्जन सोशल मीडियात व्हायरल!
मुंबई : स्वातंत्र्य दिन काही दिवसांवरच आहे. सिग्नलवर तिरंग्याची विक्रीही सुरु झाली आहे. अशात सोशल मीडियावरही स्वातंत्र्य दिनाबाबत काही गोष्टी व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या व्हिडीओला पसंती दिली जात आहे.
या व्हिडीओत एका व्यक्तीने पियानोवर 'जन गण मन' हे गाणं प्ले केलंय. त्यामुळे १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ अधिक पसंत केला जात आहे. या व्हिडीओला केवळ ९ दिवसात ४१ मिलियन म्हणजेच ४ कोटी १० लाख लोकांनी पाहिलंय. आता ही संख्या आणखी वाढली असेल.
पियानोवर 'जन गण मन' प्ले करणाऱ्या व्यक्तीचं नाव शायन इटालिया असं आहे. मुंबईत राहणारे इटालिया हे संगीत क्षेत्रातील लोकप्रिय नाव असून ते गीतकार आणि पियानो वादक आहेत.
Proud to pay this tribute to India and to my mother’s memory, the #IndianNationalAnthem. This is close to my heart – launching the #IWouldStandForThis global initiative: https://t.co/32osHcw40W @narendramodi@makeinindia#JanaGanaMana#RabindranathTagore#CancerAwareness#Indiapic.twitter.com/QqqXEgmqzk
— Shayan Italia (@ShayanItalia) August 4, 2018
शायन यांनी हा व्हिडीओ आपली आई आणि देशाला समर्पित केलाय. शायन यांच्या आईचं निधन कॅन्सरमुळे झालं होतं. त्यांनीच शायन यांना एक पियानो गिफ्ट दिला होता. कारण शायनला संगीत खूप प्रिय आहे.