ढूंढते रह जाओगे! 'या' फोटोतील लपलेला उंट शोधून दाखवा; बघा तुम्हाला जमतंय का!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:05 PM2021-09-24T15:05:39+5:302021-09-24T15:06:11+5:30

बऱ्याचदा असं होत असतं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादी वस्तू किंवा काहीही असतं पण ते लगेच दिसत नाही.

A photo is going viral on social media. Find the camel in this photo. | ढूंढते रह जाओगे! 'या' फोटोतील लपलेला उंट शोधून दाखवा; बघा तुम्हाला जमतंय का!

ढूंढते रह जाओगे! 'या' फोटोतील लपलेला उंट शोधून दाखवा; बघा तुम्हाला जमतंय का!

Next

सोशल मीडियावर अनेकदा नेटकऱ्यांना कोड्यात पाडणारे फोटो किंवा पझल व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे सध्याच्या लॉकडाउनच्या काळात अनेक जण टाइमपास म्हणून किंवा उत्सुकता म्हणून हे पझल सोडवण्याचा प्रयत्न करतात. 

बऱ्याचदा असं होत असतं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादी वस्तू किंवा काहीही असतं पण ते लगेच दिसत नाही. सध्या सोशल मीडियावरही असाचं एक फोटो व्हायरल झाला आहे. 

सदर फोटोमध्ये असंख्य प्राणी दिसत असून त्यातून उंटाचा फोटो शोधून दाखवा असं सांगण्यात आलं आहे. हा फोटो प्रचंड गुंतागुंतीचा असून अनेकांना त्यातील उंट काही सापडलेला नाही. मात्र, उत्सुकतेपोटी अनेक जण हा फोटो निरखून पाहात आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्राण्यांच्या सहाय्याने एका माणसाचा चेहरा रेखाटण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात असंख्य प्राणी दिसत आहेत. परंतु, यात एक उंटदेखील लपला आहे. तो शोधा असं काबरा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
 

Web Title: A photo is going viral on social media. Find the camel in this photo.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app