पोपटाने तरूणाला दिला झटका, गर्लफ्रेंड समोरच केली त्याच्या दुसऱ्या अफेअरची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 13:07 IST2024-01-09T13:07:02+5:302024-01-09T13:07:42+5:30
या तरूणाचा पाळीव पोपट त्याच्या गर्लफ्रेंड (Boyfriend Cheat Girlfriend) समोर असं काही बोलला ज्यामुळे दोघांचं रिलेशनशिप बिघडलं आहे.

पोपटाने तरूणाला दिला झटका, गर्लफ्रेंड समोरच केली त्याच्या दुसऱ्या अफेअरची पोलखोल
बरेच लोक आपल्या घरात पोपट पाळतात जे आपल्या मालकांना बघून मनुष्यांसारखे बोलू लागतात. ते साउंड कॉपी करतात आणि नंतर मनुष्यांसारखं बोलू लागतात. पण अनेक बोलणाऱ्या पोपटांमुळे मालकांची फजितीही होते. असंच काहीसं एका तरूणासोबत झालं. या तरूणाचा पाळीव पोपट त्याच्या गर्लफ्रेंड (Boyfriend Cheat Girlfriend) समोर असं काही बोलला ज्यामुळे दोघांचं रिलेशनशिप बिघडलं आहे. तरूणीने याचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर असे काही ग्रुप आहेत ज्यावर लोक नाव न सांगता आपल्या गोष्टी शेअर करत असतात आणि लोकांकडून सल्ले घेत असतात. असंच एका तरूणीने केलं. तिने तिच्या बॉयफ्रेंड (Pet Parrot Expose Boyfriend Affair) बाबत असं काही सांगितलं जे हैराण करणारं आहे. r/relationship_advice नावाच्या ग्रुपवर @AlaskaStiletto नावाच्या यूजरने आपला बॉयफ्रेंड आणि त्याच्या पाळीव पोपटाबाबत सांगितलं.
पोपटाने केला भांडाफोड
25 वर्षीय तरूणीने लिहिलं की, ती एका अजब स्थितीत अडकली आहे. एक दिवस ती तिच्या 26 वर्षीय बॉयफ्रेंड जॉनीच्या घरी फॅमिली डिनरसाठी गेली होती. तिथे तरूणाने आई-वडिलही होते. त्यांच्याकडे एक पाळीव पोपट आहे ज्याचं नाव पर्सी आहे. तरूणीने सांगितलं की, पर्सी रात्रभर जेस नावाच्या तरूणीचं नाव घेत राहिला आणि म्हणाला की, जॉनी जेसवर प्रेम करतो. पण ती अशा कोणत्याही मुलीला ओळखत नाही जी तिच्या बॉयफ्रेंडच्या परिवारात आहे. जेव्हा जेव्हा पोपट त्या तरूणीचं नाव घेत होता, बॉयफ्रेंड अस्वस्थ होत होता. डिनरवेळी तरूण फोनकडे अस्वस्थ होत बघत होता आणि फोन उलटा करून टेबलवर ठेवत होता. असं तो नेहमी करत नसतो. जेव्हा रात्री तरूणीने त्याला विचारलं की, जेस कोण आहे आणि पोपट कोणाबाबत बोलत आहे तर तो भडकला. तो तरूणीवर ओरडू लागला आणि म्हणाला की, तू केवळ एका पोपटाच्या सांगण्यावरून आपल्या बॉयफ्रेंडवर संशय करत आहे जे चुकीचं आहे.
लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
जेसने सांगितलं की, जेव्हा दोघांमधील वाद वाढला तेव्हा ती आपल्या घरी परत गेली आणि तेव्हापासून ती तरूणासोबत बोलली सुद्धा नाही. तिने लोकांना विचारलं की, ती तिच्या जागी बरोबर आहे का आणि तिने असा विचार करायला हवा की नको? अनेकांनी कमेंट करत तिला सल्ला दिला की, तुला हे ठरवावं लागेल की, तुला त्या तरूणासोबत रहायचं आहे किंवा नाही. दुसऱ्याने लिहिलं की, तू आणखी माहिती काढली पाहिजे आणि मगच निर्णय घेतला पाहिजे.