गर्लफ्रेन्डसोबत बेडवर लेटून होता बॉयफ्रेन्ड, कुत्र्यामुळे पिस्तुलातून सुटली गोळी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:31 IST2025-03-11T17:30:26+5:302025-03-11T17:31:41+5:30

एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीनं त्याच्यासोबत झालेल्या अपघाताबाबत सांगितलं तर पोलिसही हैराण झाले.

Pet dog mistakenly shoots owner while he was in bed with girlfriend | गर्लफ्रेन्डसोबत बेडवर लेटून होता बॉयफ्रेन्ड, कुत्र्यामुळे पिस्तुलातून सुटली गोळी आणि मग...

गर्लफ्रेन्डसोबत बेडवर लेटून होता बॉयफ्रेन्ड, कुत्र्यामुळे पिस्तुलातून सुटली गोळी आणि मग...

जीवनात एखादी घटना कधी आणि कशी घडेल काहीच सांगता येत नाही. चालता चालताही काही होऊ शकतं. तर झोपेतही होऊ शकतं. या घटना अशा असतात ज्यांवर सहजपणे विश्वासही बसत नाही. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीनं त्याच्यासोबत झालेल्या अपघाताबाबत सांगितलं तर पोलिसही हैराण झाले.

न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, या व्यक्ती जे सांगितलं त्यावर कुणाचाही सहज विश्वास बसणार नाही. पण हे घडलंय. व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं की, त्याच्या पाळीव पिटबुल कुत्र्याकडून चुकून पिस्तुलमधून गोळी झाडल्या गेल्या. त्यावेळी ही व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत बेडवर झोपून होतील. सुदैवानं यात दोघांचाही जीव वाचला. 

जेराल्ड किर्कवुड नावाच्या या व्यक्तीनं सांगितलं की, तो त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत बेटवर लेटून होता. यावेळी अचानक त्याचा पाळीव कुत्रा पिटबुल ओरिओ उड्या मारत त्याच्याकडे धावत आला. चुकून त्याचा पंजा पिस्तुलच्या ट्रिगरवर पडला आणि गोळी झाडली गेली. सुदैवानं गोळी केवळ त्याच्या मांडीला स्पर्शून गेली. जेराल्डला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. 

पोलिसांना जेव्हा याबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा त्यांना यावर विश्वास बसला नाही. तरूणीनं पोलिसांना सांगितलं की, या घटनेनंतर तिच्या ज्या पिस्तुलातून गोळी झाडली गेली होती. ती लपवण्यात आली. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहे. हा एक अपघात होती, पण गोळी लागली असती तर कुणाचा जीवही जाऊ शकला असता.

Web Title: Pet dog mistakenly shoots owner while he was in bed with girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.