एक व्यक्ती विषारी नागाचे चुंबन घेण्याच्या होता प्रयत्नात, अन् पुढ झालं भयंकर...; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 17:40 IST2022-10-21T17:36:54+5:302022-10-21T17:40:26+5:30
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ भयंकर असतात.अलीकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

एक व्यक्ती विषारी नागाचे चुंबन घेण्याच्या होता प्रयत्नात, अन् पुढ झालं भयंकर...; व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ भयंकर असतात.अलीकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विषारी नागासोबत खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती नागाजवळ जाऊन त् नागाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करत आहे.
विषारी नागाला पाहिल्यानंतर तो व्यक्ती घाबरला असल्याचे दिसत आहे.हा व्हिडिओ अनेकांना पाहायला आवडला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती नागाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही वेळाने तो व्यक्ती त्या नागाचे चुंबन घेण्यात यशस्वी होतो.
एक तरुण विषारी नागाचा घेत होता चुंबन, थोडक्यात वाचला; व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडिओ सौरभ जाधव नावाच्या एक युजरने शेअर केला आहे.सर्पतज्ज्ञ वावा सुरेश यांच्या नावाचा उल्लेख करत शेअर केला आहे. सुरेश केरळमधील एक लोकप्रिय सर्पमित्र आहे, त्यांनी ३८,००० हून अधिक नाग पकडले आहेत.त्यांना केरळमध्ये लोक 'स्नेक मॅन ऑफ केरळ' असेही म्हणतात आणि त्यांनी १९० हून अधिक किंग कोब्रांना वाचवले असल्याचे सांगितले जात आहे.