बापरे! एक- दोन नाही तर ९ मुलांना सायकलवर बसवून नेत होता पठ्ठया; IPS अधिकारी म्हणाले.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 19:07 IST2021-01-22T18:59:43+5:302021-01-22T19:07:24+5:30
हा व्हिडीओ अनेकांनी पसंत केला असून या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्सही आल्या आहेत.

बापरे! एक- दोन नाही तर ९ मुलांना सायकलवर बसवून नेत होता पठ्ठया; IPS अधिकारी म्हणाले.....
सोशल मीडियावर नेहमीच आगळेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. तर काही व्हिडीओ पाहून सगळेचजण चकीत होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला गंमत वाटेल. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी पसंत केला असून या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्सही आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका माणसानं एक दोन नाही तर तब्बल ९ मुलांना सायकलवर बसवलं आहे.
ऊपर से इनका तो मोटर व्हीकल एक्ट के तहत चालान भी नहीं कटेगा 😅😅 https://t.co/wNPBz5sd64
— Dipanshu Kabra (@ipskabra) January 21, 2021
हा व्हिडिओ शेअर करताना आयपीएस अधिकारी दिपांशु काब्रा यांनी एक गमतीदार कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, 'सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोटार वाहन कायद्यांतर्गत चालान कापलं जाणार नाही. तुम्ही स्वत: पाहा की ही व्यक्ती सायकलवर बसून ९ मुलांना कशी घेऊन जात आहे. मुलं किती आरामात सायकलवर बसली आहेत आणि या प्रवासाचा आनंद घेत आहेत. लोक या व्यक्तीचे कौतुक करीत आहेत, त्यांनी सायकलवरुन इतक्या मुलांना बॅलेन्स कसे केले आणि इतकी आरामदायक सायकल कशी चालवत आहेत. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आई ती आईच! समोर आला माय लेकाच्या भेटीचा अनोखा व्हिडीओ; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक
हा व्हिडिओ आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि त्यावर लोक बर्याच मजेदार कमेंट्स देखील देत आहेत. एका सोशल मीडिया युजरने भाष्य केले आणि लिहिले की, 'मुलगी वाचवा, नाहीतर मुलगी पडेल.' दुसर्याने लिहिले आहे की, 'सर, आतापर्यंत एकतेत शक्ती असल्याचे ऐकले होते, पण इथे एकतेत संतुलन आहे.' वाह, भारीच! मासेमाराच्या हाती लागला २ कोटींचा खजिना; व्हेलच्या उलटीनं नशीबच पालटलं ना राव