बोंबला! कोरोनाची लस घेताच भलत्याच भाषेत बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 17:50 IST2021-02-05T17:45:09+5:302021-02-05T17:50:47+5:30
Trending Viral News in Marathi : कोरोना लस घेतल्यावर लगेच मला काही दुष्परिणाम झाले नाहीत परंतु नंतर हळू हळू ..." असे म्हणत त्या व्यक्तीचा आवाज बदलला आणि त्याचा चेहरा देखील बदलला.

बोंबला! कोरोनाची लस घेताच भलत्याच भाषेत बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले...
उद्योगपती हर्ष गोयंका नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतात. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर हर्ष गोयंका चर्चेत आले आहेत. गोयंकानी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात एका बाजूला इंजेक्शन आणि दुसऱ्या बाजूला एका माणसाचा फोटो दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्या या व्यक्तीचा आवाजही ऐकू आला आहे. ज्यामध्ये तो कोरोना लस अत्यंत मजेदार पद्धतीने घेण्याचा आपला अनुभव सांगत आहे.
Effect of the Chinese vaccine....😀😀😀 pic.twitter.com/1rzPzpc3IM
— Harsh Goenka (@hvgoenka) February 4, 2021
हा व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोएंका यांनी 'चीनी वॅक्सिनचा प्रभाव' असं कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओमध्ये, ती व्यक्ती असे म्हणत आहे की आपण ते काळजीपूर्वक ऐकू शकता की "कोरोना लस घेतल्यावर लगेच मला काही दुष्परिणाम झाले नाहीत परंतु नंतर हळू हळू ..." असे म्हणत त्या व्यक्तीचा आवाज बदलला आणि त्याचा चेहरा देखील बदलला. बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय?
सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडीओ गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओ आतापर्यंत १३ हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एका सोशल मीडिया युजरनं म्हटलं आहे की, 'दुसरी भाषा शिकण्याचा सर्वात सोपा मार्ग'. दुसऱ्या युजरनं म्हटलं की, त्यापेक्षा हे चांगले आहे ... कायमस्वरुपी मास्कचा वापर करायला हवा.' कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ