भारीच! बायको ओरडायला लागताच असे कान बंद करतो पठ्ठ्या; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
By Manali.bagul | Updated: February 23, 2021 19:02 IST2021-02-23T18:53:56+5:302021-02-23T19:02:08+5:30
Trending Viral Video in Marathi : हर्ष गोयंका यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून आपण देखील सहमत व्हाल की जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या पत्नीस घाबरतो.

भारीच! बायको ओरडायला लागताच असे कान बंद करतो पठ्ठ्या; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
नवरा बायकोची भांडणं सगळीकडेच कॉमन असतात. जिथे भांडणं होत नाहीत असं एकही घर तुम्हाला दिसणार नाही. कधी कधी पार्टनरची कटकट जास्त होत असेल तर दोघांमधील एक व्यक्ती बाहेर निघून जाते किंवा बोलणं टाळते. पण इथे मात्र एक वेगळाच प्रकार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात आणि बर्याचदा लोकांसाठी मजेदार आणि प्रेरणादायक व्हिडिओही शेअर करतात. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. हर्ष गोयंका यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून आपण देखील सहमत व्हाल की जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या पत्नीला घाबरते.
I have been practicing this... for my post dinner chats with my wife ! pic.twitter.com/qeYaot2tED
— Harsh Goenka (@hvgoenka) February 21, 2021
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक माणुस विचित्र पद्धतीनं आपले कान बंद करीत आहे. सोबतच्या व्हिडिओवर असे लिहिले आहे की, जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती. व्हिडिओमध्ये लिहिलेले आहे की, जेव्हा या माणसाची बायको त्याच्याशी भांडते, तेव्हा तो असे कान बंद करू शकतो. त्याचवेळी हा व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयंकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'मी शिकत आहे ... जेवल्यानंतर पत्नीशी बोलण्यासाठी.'
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू कसा होतो?; कॅमेरात कैद झाल्या वॉर्डमधील रुग्णांच्या वेदना, पाहा फोटो
लोक हा व्हिडिओ खूपच पसंत करत आहेत आणि त्यावर मजेदार टिप्पण्याही देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, 'सर, आज तुम्हाला उपाशी झोपवावे लागेल.' तर दुसर्या वापरकर्त्याने लिहिले की, 'आपली पत्नी ट्विटर वापरत नाही असे दिसते आहे.' हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लय भारी! कचरा वेचणाऱ्या मुलांचा आनंद महिंद्रांनी शेअर केला फोटो अन् म्हणाले.....