लय भारी! कचरा वेचणाऱ्या मुलांचा आनंद महिंद्रांनी शेअर केला फोटो अन् म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 04:15 PM2021-02-23T16:15:10+5:302021-02-23T16:24:21+5:30

Anand mahindra announced training to two gabage collector brothers : विशेष म्हणजे त्यांनी या दोघांचेही कौशल्य जगभरातील लोकांना दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

Anand mahindra announced training to two gabage collector brothers from new delhi after watching a viral video | लय भारी! कचरा वेचणाऱ्या मुलांचा आनंद महिंद्रांनी शेअर केला फोटो अन् म्हणाले.....

लय भारी! कचरा वेचणाऱ्या मुलांचा आनंद महिंद्रांनी शेअर केला फोटो अन् म्हणाले.....

googlenewsNext

महिंद्रा ग्रुपचे संस्थापक आनंद महिंद्रा (Anand mahindra)  सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांसाठी सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून ते नेहमीच वेगवेगळे गमतीदार व्हिडीओ शेअर करत असतात तसंच इतरांनाही नवनवीन गोष्टी करण्यास प्रवृत्त करतात. सध्या आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या दोन भावंडाचा व्हिडीओ शेअर केला आहे.  विशेष म्हणजे त्यांनी या दोघांचेही कौशल्य जगभरातील लोकांना दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

पुढे दुसरं ट्वीट करत आनंद महिंद्रांनी लिहिलंय की, '' त्यांची प्रतिभा ही स्पष्ट आहे, पण अजून कच्ची आहे. मी त त्यांच्या या कलेला वाव देऊ इच्छितो. दिल्लीमध्ये संध्याकाळच्या वेळी त्यांना ट्रेनिंग देऊ शकेल अशा संगीत शिक्षकाची माहिती कोणी मला देऊ शकेल का? कारण दिवसभर ते दोघं काम करत असतात.'' आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ..तर नदीमध्ये बुडाली असती 'ही' चिमुकली, श्वानानं चलाकीनं वाचवला जीव; पाहा व्हिडिओ

खऱ्या टॅलेंटला संधी मिळायला हवी अशा प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत.  त्याबरोबर या दोघांसाठी गाण्याचा शिक्षक मिळवून देणाऱ्या काही कमेंट्सही आल्या आहेत. सोशल मीडियाचा वापर फक्त व्हिडीओ शेअर करून फॉरवर्ड करण्यापुरता न ठेवता, त्यातून अशा प्रतिभेला वाव मिळाला तर ते जास्त संयुक्तिक ठरेल, हाच या व्हिडीओ मागचा उद्देश आहे.  या व्हिडीओजवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

Web Title: Anand mahindra announced training to two gabage collector brothers from new delhi after watching a viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.