Video - अरेरे! पाऊस आला पण लग्नातलं जेवण नाही सोडलं; पाहुण्यांचा जुगाड पाहून पोट धरून हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:26 IST2022-06-30T15:20:17+5:302022-06-30T15:26:37+5:30
Video - ज्यामध्ये लग्नादरम्यान मुसळधार पाऊस पडला. यावेळी पाहुण्यांनी जेवण्यासाठी जे केलं यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

Video - अरेरे! पाऊस आला पण लग्नातलं जेवण नाही सोडलं; पाहुण्यांचा जुगाड पाहून पोट धरून हसाल
नवी दिल्ली - सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नाचे विविध हटके व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. लग्नातील गमती-जमती, नवरा नवरीचे नवनवीन व्हिडीओ हे नेहमीच समोर येत असतात. अशाच एक भन्नाट व्हि़डीओ व्हायरल झाला असून तो पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. लग्न म्हटलं की जेवण आलंच. लग्नाचं जेवण सर्वांनाच आवडतं.
काही लोक लग्नाला फक्त जेवायलाच जातात. तुम्ही जर लग्नाला गेला असाल आणि जेवताना मुसळधार पाऊस पडला तर तुमचा मूड बिघडेल आणि खाण्याची मजाही निघून जाईल. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नादरम्यान मुसळधार पाऊस पडला. यावेळी पाहुण्यांनी जेवण्यासाठी जे केलं यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका लग्नसमारंभामध्ये पाहुणे जेवायला बसले आहेत. त्याचवेळी जोरदार पाऊस पडायला सुरुवात होते. मात्र यावेळी आपल्या जागेवरून उठून न जाता हे पाहुणे तिथे ठेवलेल्या खुर्च्या एका हाताने डोक्यावर पकडून आरामात बसून जेवत आहेत. मुसळधार पावसातही पाहुण्यांनी जेवण सोडले नाही, तर पावसाचा आनंद घेत जेवणाचाही आनंद लुटला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांनाही तो खूप आवडत आहे हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mr_90s_kidd_ नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. है व्हिडीओ आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.