माणुसकीला काळीमा! समुद्र किनारी डॉल्फिन दिसताच लाठ्या काठ्यांनी मारलं; अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 07:11 PM2021-01-08T19:11:09+5:302021-01-08T19:24:05+5:30

Viral News: पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

People killed pink dolphin by axe and stick pratapgarh | माणुसकीला काळीमा! समुद्र किनारी डॉल्फिन दिसताच लाठ्या काठ्यांनी मारलं; अन् मग....

माणुसकीला काळीमा! समुद्र किनारी डॉल्फिन दिसताच लाठ्या काठ्यांनी मारलं; अन् मग....

Next

मुक्या जनावरांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. माणसांच्या बेजबाबदारपणामुळे निष्पाप प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगढमधील शारदा समुद्र परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या ठिकाणी काही नराधमांनी डॉल्फिनला मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

उत्तर प्रदेशात ही घटना घडली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. गुलाबी डॉल्फिनला काही लोक लाकडाने अमानुषपणे मारत होते. डॉल्फिनची हत्या केल्यानं संपूर्ण पाणी लाल झालेलं दिसून आलं. गंगा डॉल्फिन भारताचा दुसरा राष्ट्रीय जलचर जीव आहे. 

आधीच डॉल्फिनच्या काही प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशात या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.  डॉल्फिनला अमानुषपणे मारण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात डॉल्फिनवर लोक वार करताना दिसून येत आहेत. दोघी बहिणींच्या शरीरात होत्या ३ किडन्या; जन्माला येताच डॉक्टरांनी केली होती मृत्यूची भविष्यवाणी अन् आता..

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनलच्या बाजूला डॉल्फिनचा मृतदेह दिसला. गावकऱ्यांना विचारलं असता त्यांच्यापैकी कोणीही मृत्यू कसा झाला हे सांगण्यास तयार नव्हतं.  डॉल्फिनच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत अटक केली आहे. कडक सॅल्यूट! गोरगरिब मुलांना शिक्षण देण्यासाठी संपूर्ण पगार खर्च करतोय 'हा' खाकीतला देवमाणूस

Web Title: People killed pink dolphin by axe and stick pratapgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.