विमानात 'त्याने' केला असाकाही कारनामा; लोक म्हणाले, अखेर हे झालं कसं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:11 IST2019-09-10T12:06:46+5:302019-09-10T12:11:00+5:30

सोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला असून हा फोटो passengershaming नावाच्या व्हेरिफाइड इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे.

Passenger lying below plane seats divides internet viral photo | विमानात 'त्याने' केला असाकाही कारनामा; लोक म्हणाले, अखेर हे झालं कसं काय?

विमानात 'त्याने' केला असाकाही कारनामा; लोक म्हणाले, अखेर हे झालं कसं काय?

सोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला असून हा फोटो passengershaming नावाच्या व्हेरिफाइड इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. या फोटोत एक प्रवासी विमानातील सीटखाली झोपलेला दिसतो आहे. यावरून हे दिसून येतं की, लांबच्या प्रवासात इकॉनॉमी क्लासची सीट आरामदायी असते वा नाही. पण लोकांना हा प्रश्न पडला की, ही व्यक्ती सीटखाली अ‍ॅडजस्ट कशी झाली?

हा फोटो ८ सप्टेंबरला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. यात एक व्यक्ती सीटखाली निवांत झोपलेली दिसत आहे. केवळ एकाच सीटखाली नाही तर तो मागच्या आणि पुढच्या सीटखाली आहे. फोटो शेअर करताना 'हे कसं झालं?' असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

या फोटोने सर्वांनाच प्रश्नात पाडलं असून ९ हजार लोकांनी हा फोटो लाइक केलाय तर ४०० पेक्षा जास्त यावर कमेंट आल्या आहेत. हा फोटो कुणाचा आहे? कोणत्या फ्लाइटमधील आहे? आणि तो सीटखाली का झोपला? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Web Title: Passenger lying below plane seats divides internet viral photo