निरागसता! आई-बाबांनी कुत्रा पाळण्यास दिला नकार, चिमुकलीने देवाला लिहिलं पत्र आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:51 IST2025-10-24T14:10:08+5:302025-10-24T14:51:56+5:30

Girls Letter To God : ऐकायला जरी गंमतीशीर वाटत असलं तरी इंग्लंडमधून अशीच एक खरी घटना समोर आली आहे, जी सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.

Parents refused to let her keep a dog, little girl wrote a letter to God goes viral | निरागसता! आई-बाबांनी कुत्रा पाळण्यास दिला नकार, चिमुकलीने देवाला लिहिलं पत्र आणि मग...

निरागसता! आई-बाबांनी कुत्रा पाळण्यास दिला नकार, चिमुकलीने देवाला लिहिलं पत्र आणि मग...

Girls Letter To God : आजकाल भलेही इंटरनेटचा जमाना आला असला तरी बरेच लोक आजही मोबाइल, कम्प्युटरऐवजी आपल्या नातेवाईकांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत पत्राने संवाद साधतात. पण कल्पना करा, जर कुणी देवाला पत्र लिहिलं आणि त्याचं उत्तर खरंच आलं, तर कसं वाटेल? ऐकायला जरी गंमतीशीर वाटत असलं तरी इंग्लंडमधून अशीच एक खरी घटना समोर आली आहे, जी सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.

देवाला लिहिलं पत्र आणि मग..

आपल्याला आश्चर्य वाटेल की, एका 8 वर्षांच्या मुलीने देवाला पत्र लिहिलं आणि तिला देवाकडून खरंच उत्तर देखील मिळालं. तिच्या आईने ही संपूर्ण कहाणी Reddit वरच्या r/AskUK या फोरमवर शेअर केली. तिने पोस्टचं शीर्षक दिलं होतं – “Who replied to my daughter’s letter to God?”

मुलीच्या आईने सांगितलं की तिची मुलगी कुत्र्यांची खूप शौकीन आहे आणि काही महिन्यांपूर्वी तिने रेस्क्यू सेंटरमधून आणखी एक कुत्रा दत्तक घेण्याची विनंती केली होती. घरच्यांनी काही कारणास्तव नकार दिला आणि मुलगी नाराज होऊन आपल्या खोलीत गेली. एक तासानंतर ती एका लिफाफ्यासह बाहेर आली आणि तो रस्त्यावरच्या पोस्ट बॉक्समध्ये टाकून दिला.

Who replied to my daughter's letter to god?
byu/Normal-Ad2587 inAskUK

सहा महिन्यांनंतर आलं देवाचं उत्तर

सहा महिन्यांनी त्या मुलीला एक पत्र आलं, ज्याने सर्वांना थक्क केलं. ते पत्र साध्या कागदावर टाईप केलेलं होतं, पण नाव आणि पत्ता हाताने लिहिला होता. लिफाफ्यावर रॉयल मेलचं प्री-पेड स्टॅम्प होतं, पण कुठलाही रिटर्न अ‍ॅड्रेस किंवा पोस्टमार्क नव्हता.

आई म्हणाली, “मुलीने हे पत्र देवाला लिहिलं हे सांगेपर्यंत आम्ही एक तास गोंधळलेलो आणि घाबरलेलो होतो. हे विचारण्यासाठी की देव तिचं स्वप्न पूर्ण करून तिला कुत्रा मिळवून देतील का.”

तिने पत्रावर पत्ता लिहिला होता...

“To God, Cloud 9, Heaven.”

अशा पत्त्यावर काहीही पोहोचणं शक्य नाही, पण तरीही तिला उत्तर आलं.

यूजर्सच्या प्रतिक्रिया?

ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अंदाज लावायला सुरुवात केली की देवाच्या नावाने आलेलं ते पत्र खरं तर कुणी लिहिलं असेल?
एका यूजरने लिहिलं की, “अशा चुकीच्या पत्त्याची पत्रं National Returns Centre, Belfast येथे जातात. तिथले कर्मचारी कधी कधी दयाळूपणाने अशी पत्रं स्वतः उत्तर देतात.” दुसऱ्या यूजरने सांगितलं की, “कदाचित रॉयल मेलच्या Specialist Handwriting Team ने हे उत्तर पाठवलं असेल.”

Web Title : मासूमियत! बच्ची ने कुत्ते के लिए भगवान को लिखा पत्र, मिला जवाब!

Web Summary : कुत्ते से वंचित, 8 वर्षीय बच्ची ने भगवान को पत्र लिखा। महीनों बाद, उसे एक जवाब मिला, जिससे प्रेषक की पहचान और दयालुता के बारे में ऑनलाइन अटकलें लगने लगीं।

Web Title : Innocence! Girl writes to God for a dog, gets reply!

Web Summary : Denied a dog, an 8-year-old girl wrote to God. Months later, she received a reply, sparking online speculation about the sender's identity and kindness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.