Viral Video: पालकांनो, मुलांच्या हातात मोबाईल देताय? 'हा' व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:52 IST2026-03-12T18:50:09+5:302026-03-12T18:52:13+5:30
सध्याच्या डिजिटल युगात रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी किंवा जेवण भरवण्यासाठी पालकांकडे मोबाईल हा सर्वात सोपा उपाय झाला आहे. मात्र, हाच मोबाईल तुमच्या चिमुकल्यांसाठी जीवावर बेतू शकतो, हे सिद्ध करणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video: पालकांनो, मुलांच्या हातात मोबाईल देताय? 'हा' व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल
सध्याच्या डिजिटल युगात रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी किंवा जेवण भरवण्यासाठी पालकांकडे मोबाईल हा सर्वात सोपा उपाय झाला आहे. मात्र, हाच मोबाईल तुमच्या चिमुकल्यांसाठी जीवावर बेतू शकतो, हे सिद्ध करणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणत्याही पालकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सोफ्यावर आरामात बसून मोबाईलवर काहीतरी पाहण्यात मग्न असल्याचे दिसते. मात्र, काही सेकंदातच तिथे अत्यंत भयंकर प्रकार घडतो. मुलीच्या हातातील मोबाईलचा अचानक भीषण स्फोट होतो. स्फोटाचा आवाज आणि तीव्रता इतकी मोठी होती की, ती मुलगी घाबरून सोफ्यावरून खाली कोसळते. त्यानंतर ती तिथून रडत पळत जाते. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
आपके भी बच्चे मोबाइल फोन चलाते हैं,
— ᵐᵗᵠ (@55MTQ_) March 11, 2026
तो फिर....
सावधान हो जाओ 🥺 pic.twitter.com/rRwAjGXgiH
हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर@55MTQ_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत जवळपास ४९,००० हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एका वापरकर्त्याने भीती व्यक्त करताना लिहिले, "हा अतिशय भयानक अपघात होता." दुसऱ्या एका युजरने सावधगिरीचा इशारा देत म्हटले, "हे खरोखरच खूप धोकादायक आहे." दरम्यान, काही तज्ज्ञांनी हा व्हिडिओ एआय जनरेट असल्याची शक्यताही वर्तवली आहे. व्हिडिओ खरा असो वा बनावट, पण मोबाईलमधील बॅटरी गरम होऊन स्फोट होण्याच्या घटना नवीन नाहीत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे.
पालकांनी कोणती काळजी घ्यावी:
- फोन चार्ज होत असताना तो कधीही मुलांच्या हातात देऊ नका.
- मुलांना मोबाईलची सवय लावण्यापेक्षा मैदानी खेळांकडे वळवा.
- मोबाईलची बॅटरी फुगली असेल किंवा फोन जास्त गरम होत असेल, तर तो तातडीने दुरुस्त करा.