पाकिस्तानातील बाइक मॉडल पाहून लोक हसून हसून बेजार, म्हणाले - हे फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:51 IST2024-11-19T15:46:49+5:302024-11-19T15:51:44+5:30
Viral Video : एका व्यक्तीने बाइक अशी काही मॉडिफाय केली की, लोकांना हसू आवरत नाहीये. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

पाकिस्तानातील बाइक मॉडल पाहून लोक हसून हसून बेजार, म्हणाले - हे फक्त...
Pakistan Modify Bike: सोशल मीडियावर वेगवेगळे जुगाडाचे किंवा अजब प्रयोगांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर असे असतात की, बघून विश्वासही बसत नाही. पाकिस्तानातीलही असे अनेक गमतीदार व्हिडीओ समोर येत असतात. असाच पाकिस्तानातील एका बाईकचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने बाइक अशी काही मॉडिफाय केली की, लोकांना हसू आवरत नाहीये. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
झैन की चौले नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानातील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओत एक मॉडिफाय करण्यात आलेली बाइक दाखवण्यात आली आहे. जी बघून लोकांनी मेकॅनिकची खिल्ली उडवली आहे. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, सीडी ७० बाइक आहे. जी मॉडिफाय करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे या बाइकवर ५ पेक्षा जास्त लोक आरामात बसू शकतात. या व्हिडिओवर लोक अनेक गमतीदार कमेंट्स करत आहेत.
ही बाइक पाहून लोक पाकिस्तानातील टेक्नॉलॉजी आणि त्यांच्या विकासाची खिल्ली उडवली जात आहे. एकाने यूजरने कमेंट की, "पाकिस्तानातील हायबुसा बाइकचं मॉडल". दुसऱ्याने लिहिलं की, "हे फक्त पाकिस्तानातच होऊ शकतं". लोक या बाइकवर गमतीदार कमेंट्स करत आहेत.