Video : डॉक्टरचे महिलेसोबत अश्लील चाळे, हॉस्पिटलमधील व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 11:24 IST2020-03-30T11:23:24+5:302020-03-30T11:24:55+5:30

हा व्हिडीओ सदफ यासिर खान नावाच्या महिला पत्रकाराने ट्विट केलाय आणि या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली.

Pakistan doctor's misbehave act with woman in hospital video goes viral api | Video : डॉक्टरचे महिलेसोबत अश्लील चाळे, हॉस्पिटलमधील व्हिडीओ झाला व्हायरल

Video : डॉक्टरचे महिलेसोबत अश्लील चाळे, हॉस्पिटलमधील व्हिडीओ झाला व्हायरल

पाकिस्तानच्या गुजरांवालामधून एका डॉक्टरचा अश्लील कारनामा समोर आला आहे. या डॉक्टरने एका महिलेचं लैंगिक शोषण केलं असून त्याला या गुन्ह्यामुळे त्याला त्याच्या चिकित्सक अधिक्षक पदावरून बडतर्फ करण्यात आलं आहे. डेली पाकिस्तानच्या रिपोर्टनुसार, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ पाकिस्तानातील सदफ यासिर खान नावाच्या महिला पत्रकाराने ट्विट केलाय आणि या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली. या व्हिडीओत बघायला मिळतं की, खुर्चीवर एक व्यक्ती बसली आहे आणि त्याच्यासमोर काळ्या रंगाचे कडे घालून एक महिला बसली आहे. जेव्हा ही महिला बाहेर जाण्यासाठी उभी राहते तेव्हा ती व्यक्ती तिच्याजवळ येऊन तिला जबरदस्तीने जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. 

या व्यक्तीचं नाव डॉ. फैयाज खोखर असल्याचं समजतं. ही व्यक्ती गुजरांवालातील हॉस्पिटलमध्ये एमएस पदावर कार्यरत होती. पण आता या घटनेनंतर त्याला या पदावरून काढण्यात आलं आहे.

महिला पत्रकाराने व्हिडीओ शेअर करताच गुजरावाला येथील डेप्युटी कमिश्नरने ट्विट करून रिप्लाय दिला की, या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. त्याला बडतर्फ करण्यात आलं आहे.


Web Title: Pakistan doctor's misbehave act with woman in hospital video goes viral api