शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:07 IST

Khawaja Asif Speech fumble:

Khawaja Asif Speech fumble: पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर फजिती होणे हे काही नवीन नाही. अनेक वेळा विविध कारणाने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होतच असते. आताही पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्र्यांमुळे त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावरील एका महत्त्वपूर्ण बैठकीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ त्यांच्या उच्चारांमधील चुकांमुळे चर्चेचा विषय बनले आहेत. AI मुळे निर्माण झालेली आव्हाने आणि त्याचे धोके या विषयांवर बोलत असताना त्यांची अनेकदा इंग्रजी शब्दांबाबत फजिती झाली. मीडिया रिपोर्टनुसार, आसिफ यांनी चक्क सात वेळा शब्दांचे अशुद्ध उच्चारण केले. त्यामुळे त्यांचे हे भाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

ख्वाजा आसिफ यांचे काय-काय शब्द चुकले?

ख्वाजा आसिफ भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी AI बाबत बोलायला सुरूवात केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, त्यांच्या भाषणात ते विशेषतः 'breathtaking' (ब्रेथटेकिंग), 'reshaping our world'(रिशेपिंग आवर वर्ल्ड) आणि 'space' (स्पेस) यांसारखे इंग्रजी शब्द उच्चारताना वारंवार अडखळले. याशिवाय, त्यांनी 'risk' (रिस्क) या शब्दाचा उच्चार 'riks' (रिक्स) असा केल्याने सभागृहात थोडीशी अस्वस्थताही पसरलीहोती. तो क्षणही त्वरित कॅमेऱ्यात कैद झाला.

भाषणात काय म्हणाले ख्वाजा आसिफ?

उच्चारांमधील त्रुटी बाजूला ठेवून, आसिफ यांनी AI मुळे वाढणाऱ्या गंभीर धोक्यांबाबत केलेल्या भाषणात काही महत्त्वाचे मुद्दे होते. AI मुळे युद्धाची शक्यता आणखी वाढू शकेल, निर्णय घेण्याचा वेळ कमी होईल आणि राजकीय तोडगा काढण्याचे मार्ग संकुचित होतील, अशी गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच, AI चा गैरवापर झाल्यास डिजिटल दरी वाढेल आणि जागतिक शांततेला धोका निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

यावेळी, त्यांनी नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाचा संदर्भ देत 'ऑपरेशन सिंदूर' हे AI-आधारित युद्धाच्या धोक्याचे उदाहरण असल्याचे सांगितले. मे २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे दिलेले प्रत्युत्तर, हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेले युद्ध कसे भयानक असू शकते, हे दर्शवते, असे त्यांचे म्हणणे होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistani Minister's AI Speech Fumble: Mispronunciations Cause International Mockery

Web Summary : Pakistani Defence Minister Khawaja Asif faced ridicule at the UNSC's AI meeting. His mispronunciation of English words like 'breathtaking' sparked discomfort. Despite errors, he highlighted AI's dangers, citing increased war risks and digital divide, referencing India-Pakistan conflict as an AI war example.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाPakistanपाकिस्तानministerमंत्रीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स